शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेसमोर ‘आप’चे ‘ढोल बजाओ’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:09 IST

कोल्हापूर : घरफाळा घोटाळ्याचे ऑडिट करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी महापालिकेसमोर आम आदमी पार्टीच्या वतीने ‘ढोल बजाओ’ आंदोलन केले. संगणकीय प्रणालीमध्ये ...

कोल्हापूर : घरफाळा घोटाळ्याचे ऑडिट करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी महापालिकेसमोर आम आदमी पार्टीच्या वतीने ‘ढोल बजाओ’ आंदोलन केले.

संगणकीय प्रणालीमध्ये बदल करून करपात्र मिळकतींची आकारणी कमी करणे, अनागोंदी करून घरफाळ्यात सूट देणे, मिळकतीच्या क्षेत्रफळ सर्वेक्षणात घोळ, एकाच करदात्याला दुबार बिले देऊन त्रास देणे, बनावट दुबार पावत्यांच्या माध्यमातून भ्रष्टाचार करीत महापालिकेचे प्रचंड आर्थिक नुकसान केले असल्याचा आरोप यावेळी केला.

आम आदमी पार्टीने काही दिवसांपूर्वी महापालिकेसमोर लाक्षणिक उपोषण करीत घरफाळा घोटाळ्याचे बाह्य संस्थेकडून ऑडिट करण्याची मागणी केली होती; परंतु अद्याप यावर कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे त्यांनी शुक्रवारी महानगरपालिकेसमोर प्रशासनाला जागे करण्यासाठी ‘ढोल बजाओ’ आंदोलन केले. ‘घरफाळा घोटाळ्याचे ऑडिट झालेच पाहिजे,’ अशी मागणी केली. बहिरेपणाचा आव आणलेल्या महापालिकेला जागे करण्यासाठी हे आंदोलन करीत असल्याचे ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष नीलेश रेडेकर, युवाध्यक्ष उत्तम पाटील, महिला शहराध्यक्ष अमरजा पाटील, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, आदम शेख, पल्लवी पाटील, आदी उपस्थित होते.

चौकट

‘आप’ची मागणी

सन २००७ पासून आतापर्यंतच्या घरफाळा वसुलीचे त्रयस्थ विश्वासू संस्थेकडून ऑडिट करा.

संगणकीय प्रणाली (सॉफ्टवेअर) पूर्णतः बदलून नवीन प्रणाली विकसित करा.

६५०० मिळकतींचा घरफाळा शून्य दाखविणाऱ्या तत्कालीन जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा.

फोटो : २९०१२०२१ कोल केएमसी आम आदमी पार्टी आंदोलन

ओळी : कोल्हापुरातील आम आदमी पार्टीच्या वतीने शुक्रवारी घरफाळा घोटाळ्याच्या ऑडिट करण्याच्या मागणीसाठी ‘ढोल बजाओ’ आंदोलन केले.