अपघात पाहणाऱ्या गर्दीने वाचवला चालकाचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 14:05 IST2020-06-06T14:03:32+5:302020-06-06T14:05:54+5:30

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जखमी ट्रक चालकाला वेळेत बाहेर काढून त्याचा जीव अपघात पहायला जमलेल्या गर्दीने वाचवला आहे.

The driver's life was saved by the crowd watching the accident | अपघात पाहणाऱ्या गर्दीने वाचवला चालकाचा जीव

अपघात पाहणाऱ्या गर्दीने वाचवला चालकाचा जीव

ठळक मुद्देअपघात पाहणाऱ्या गर्दीने वाचवला चालकाचा जीवपुणे-बंगळुरू हायवेवर फ्रुटमार्केट समोर अपघात

बेळगाव : ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जखमी ट्रक चालकाला वेळेत बाहेर काढून त्याचा जीव अपघात पहायला जमलेल्या गर्दीने वाचवला आहे.

थांबलेल्या टमटम रिक्षावाहू ट्रकला पाठीमागून मालवाहू ट्रकने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन्ही ट्रक मधील दोघेजण जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री ११:३० च्या दरम्यान पुणे-बंगळुरू हायवेवर फ्रुटमार्केट समोर हा अपघात घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टमटम रिक्षा वाहू करणारा ट्रक रस्त्यावर थांबला होता. त्याला दुसऱ्या मालवाहू ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिली. त्यात थांबलेल्या लॉरी मधील टमटम रिक्षा बाजूला पडले. त्याचे थांबलेल्या ट्रकचा ड्रायव्हर हवा चेक करण्यासाठी खाली उतरला होता.

अपघातात सामानात अडकला होता. घटनास्थळी जमलेल्या शेकडो लोकांनी अडकेलेल्या जखमी चालकास बाहेर काढून इस्पितळात रवाना केले. 

बेळगाव उत्तर रहदारी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे.अपघात पहाण्यासाठी जमलेल्या गर्दीने ढिगाऱ्याखाली अडकेल्या चालकास वेळेत बाहेर काढून त्याचा जीव वाचवला.
 

Web Title: The driver's life was saved by the crowd watching the accident