शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
4
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
5
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
6
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
7
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
8
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
9
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
10
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
11
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
12
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
13
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
14
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
15
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
16
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
17
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
18
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
19
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
20
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक चळवळींतील डॉ. गेल ऑम्वेट यांचे कृतिशील योगदान मौलिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:28 IST

विद्यापीठाचे यशवंतराव चव्हाण अध्यासन आणि यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंटतर्फे ‘डॉ. गेल ऑम्वेट: सैद्धांतिक आकलन व योगदान’ ...

विद्यापीठाचे यशवंतराव चव्हाण अध्यासन आणि यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंटतर्फे ‘डॉ. गेल ऑम्वेट: सैद्धांतिक आकलन व योगदान’ या विषयावर आदरांजली सभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, तर प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, ज्येष्ठ विचारवंत डॉ. भारत पाटणकर, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर प्रमुख उपस्थित होते. गेल ऑम्वेट या कोणत्याही अवांतर अभिनिवेशाविना भारतीय ग्रामीण समाजजीवनाशी निष्ठेने आणि मनापासून एकजीव झाल्या. चळवळीचा पिंड कायम ठेवून तिचे सिद्धांतन करण्याचे कौशल्य त्यांना साधले होते. मानवी अस्तित्वासंबंधाने नवे सिद्धांत उभे करणे आणि पूर्णत: मानुष होणे हे त्यांचे जीवनध्येय होते, असे डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले. सैद्धांतिक मांडणी करणारे खूप असतात; पण, सिद्धांत उभे करणारे दिसत नाहीत. डॉ. गेल या अशा सिद्धांत उभे करणाऱ्यांपैकी होत्या. माती, पाणी, स्त्री आणि विठ्ठल-बुद्ध या चार पायांवर त्यांनी आपल्या सिद्धांताला सक्षमपणे उभे केले होते, असे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी सांगितले. यावेळी डॉ. एस. एन. पवार, एस. एस. महाजन, पी. एस. कांबळे, भारती पाटील, रणधीर शिंदे, मेघा पानसरे, जगन कराडे यांनी मनोगते व्यक्त केली. डॉ. प्रकाश पवार यांनी प्रास्ताविक केले. अमोल मिणचेकर यांनी सूत्रसंचालन केले.

स्मृती जपण्यासाठी विद्यापीठ कार्यरत

डॉ. गेल यांनी संशोधनाचा उपयोग सामाजिक चळवळींना अधिष्ठान देण्यासाठी करणे आणि सामाजिक चळवळींबाबतचे संशोधन पुन्हा पुढे नेणे, अशी दुहेरी जबाबदारी यशस्वीरित्या पेलली होती. विद्यापीठ परिवार त्यांच्या स्मृती जपण्यासाठी विविध माध्यमांतून कार्यरत राहील, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. शिर्के यांनी दिली.

फोटो (२१०९२०२१-कोल-विद्यापीठ आदरांजली सभा) : शिवाजी विद्यापीठात मंगळवारी आदरांजली सभेच्या प्रारंभी सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गेल ऑम्वेट यांच्या प्रतिमेस कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शेजारी डावीकडून प्रकाश पवार, विलास नांदवडेकर, राजन गवस, भारत पाटणकर, पी. एस. पाटील उपस्थित होते.