शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-वैभववाडी १०८ कि.मी नवीन रेल्वेमार्गाचा डीपीआर तयार, पुढील टप्प्यातील मंजुरी प्रक्रिया लवकरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 12:02 IST

कोल्हापूर : कोल्हापूरचे श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस ते वैभववाडीदरम्यानच्या १०८ किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वेमार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) ...

कोल्हापूर : कोल्हापूरचे श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस ते वैभववाडीदरम्यानच्या १०८ किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वेमार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. आता या प्रकल्पासाठी राज्य सरकारसह विविध संबंधित घटकांशी सल्लामसलत केली जाणार आहे. त्यानंतर नीती आयोग आणि अर्थ मंत्रालय यांच्याकडून आवश्यक मंजुरी प्रक्रिया पूर्ण होईल. या सर्व प्रक्रियांमुळे प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी सध्या निश्चित करता येणार नसल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे स्पष्ट केले आहे.कोल्हापूरमधील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून एकूण ३० रेल्वेगाड्या धावतात. या गाड्यांमुळे कोल्हापूरला दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, पुणे, नागपूर यांसारख्या प्रमुख शहरांशी थेट रेल्वे संपर्क उपलब्ध आहे. यामध्ये वंदे भारत एक्सप्रेस, कोयना एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस, महालक्ष्मी एक्सप्रेस, हरिप्रिया एक्सप्रेस आदी महत्त्वाच्या गाड्यांचा समावेश आहे.प्रकल्पासाठी या बाबी महत्त्वाच्या- जमिनीचे संपादन- वनविभागाची परवानगी- अडथळा निर्माण करणाऱ्या सेवा सुविधांचे स्थलांतर- विविध प्राधिकरणांकडून कायदेशीर मंजुरी- भौगोलिक व भूपृष्ठीय परिस्थिती- कायदा व सुव्यवस्था- कामासाठी उपलब्ध कालावधी- प्रवासी व मालवाहतुकीचा अंदाज- आर्थिक व्यवहार्यता- संपर्क सुविधा, मार्गातील दुवे- राज्य सरकार व लोकप्रतिनिधींच्या मागण्या- सामाजिक-आर्थिक गरजा- निधीची उपलब्धता