कलानगर-चंदूर मार्गावर वाहतुकीची दुहेरी अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:24 AM2021-01-21T04:24:00+5:302021-01-21T04:24:00+5:30

(फोटो) लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील कलानगर-चंदूर मार्गावर मोठ्या सारण गटारीचे काम सुरू असल्याने रस्ता खोदाईमुळे खराब झाला ...

Double problem of traffic on Kalanagar-Chandur route | कलानगर-चंदूर मार्गावर वाहतुकीची दुहेरी अडचण

कलानगर-चंदूर मार्गावर वाहतुकीची दुहेरी अडचण

Next

(फोटो)

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : येथील कलानगर-चंदूर मार्गावर मोठ्या सारण गटारीचे काम सुरू असल्याने रस्ता खोदाईमुळे खराब झाला आहे. तसेच वारंवार वाहतुकीची कोंडी होत आहे. त्याचबरोबर त्या भागातील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रिंगरोडवरही मोठी खडी पसरून ठेवली असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. परिणामी रुग्णांसह नातेवाइकांना व त्या मार्गावरून जाणाऱ्यांना अडचण निर्माण झाली आहे. कलानगर-चंदूर मार्गावरील रिंग रोडलगत मोठे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. त्याचबरोबर एक्स्प्रेस विद्युत पुरवठ्यामुळे शहरातील अनेक उद्योजकांचे कारखाने शाहूनगर, चंदूर परिसरात आहेत. परिणामी या मार्गावर नेहमीच मोठी वाहतूक असते. सध्या सारण गटारीच्या कामामुळे कलानगर-चंदूर मार्गावर वाहतुकीसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. तसेच रिंग रोडवर रस्ता करण्यासाठी म्हणून गेल्या सहा महिन्यांपासून मोठी खडी पसरून ठेवली आहे. परिणामी मोटारसायकली घसरणे. चारचाकी वाहन चळणे, धूळ उडणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे एखाद्या रुग्णाला घेऊन जाताना अडचणी येत आहेत. तसेच मार्गक्रमण करणाऱ्या इतर नागरिकांनाही याचा त्रास होत आहे. याकडे प्रशासनाने ताबडतोब लक्ष देऊन काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे. (फोटो ओळी) २००१२०२१-आयसीएच-०८

२००१२०२१-आयसीएच-०९ इचलकरंजीतील कलानगर-चंदूर मार्गावर मोठ्या सारण गटारीचे काम सुरू असल्याने वारंवार वाहतुकीची कोंडी होत आहे.

२००१२०२१-आयसीएच-१०

रिंग रोडवर रस्ता करण्यासाठी म्हणून सहा महिन्यांपासून पसरून ठेवलेल्या खडीमुळे मार्गक्रमण करण्यासाठी मोठा त्रास होत आहे. (सर्व छाया-उत्तम पाटील)

Web Title: Double problem of traffic on Kalanagar-Chandur route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.