शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
2
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
3
"कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...
4
पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ! पीठ, डाळींच्या किंमती वाढणार; IMF'ने मदत केली नाही
5
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
6
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
7
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
8
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
9
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
10
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
11
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
12
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
13
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
14
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
15
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
16
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
17
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
18
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
19
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
20
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...

जिल्ह्यातील ३ लाख बालकांना पोलिओचा डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2021 11:01 AM

Health Kolhapur- नव्या वर्षातील पहिली पोलिओ लसीकरण मोहीम रविवारी जिल्हाभर उत्साहात पार पडली. सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत जिल्ह्यातील २ हजार ४५६ केंद्रांवर ३ लाख ३ हजार ५०९ बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले. लोकप्रतिनिधी, अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांनी हातात हात घालून काम करीत ही मोहीम यशस्वी केली. या मोहिमेत ७ हजार ७३६ आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ३ लाख बालकांना पोलिओचा डोस

कोल्हापूर : नव्या वर्षातील पहिली पोलिओ लसीकरण मोहीम रविवारी जिल्हाभर उत्साहात पार पडली. सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत जिल्ह्यातील २ हजार ४५६ केंद्रांवर ३ लाख ३ हजार ५०९ बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले. लोकप्रतिनिधी, अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांनी हातात हात घालून काम करीत ही मोहीम यशस्वी केली. या मोहिमेत ७ हजार ७३६ आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.सीपीआरसह जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, शहरातील सरकारी दवाखाने, सार्वजनिक ठिकाण, बसस्थानक या ठिकाणी लसीकरणासाठी टीम तैनात करण्यात आली होती. या मोहिमेचा प्रारंभ सकाळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी अधिकाऱ्यांच्या हस्ते नुकत्याच जन्मलेल्या बालकासह पाच वर्षे वयोगटातील बालकांना डोस पाजण्यात आले.सीपीआरमधील कार्यक्रमाला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, राज्य लसीकरण अधिकारी डॉ. दिलीप पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ, अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, जिल्हा‌ माता बाल संगोपन अधिकारी डॉ. फारुख देसाई, परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य महानंदा मांढरे, सार्वजनिक आरोग्य परिचारक मोजस भोसले यांची उपस्थिती होती.आमदारांचा कृतीद्वारे संदेशदक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी मुलगा अर्जुन याला कसबा बावड्यातील सेवा रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आणून लस पाजून घेतली. यानंतर पोलिओमुक्तीसाठी लस पाजून घेऊन प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन केले.

 

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूर