शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारीसाठी आग्रह नको, थांबावे लागले तर तयारी ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकूळ’ निवडणुकीसाठी विरोधी राजर्षी शाहू आघाडी जम्बो झाली असून उमेदवारीबाबत सगळ्यांचे समाधान करू शकत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकूळ’ निवडणुकीसाठी विरोधी राजर्षी शाहू आघाडी जम्बो झाली असून उमेदवारीबाबत सगळ्यांचे समाधान करू शकत नाही. त्यामुळे उमेदवारीसाठी आग्रह करू नको, थांबावे लागले तर तशी तयारी ठेवावी, अशा सूचना नेत्यांनी दिल्या.

‘गोकूळ’साठी विरोधी पॅनल बांधणी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यादृष्टीने मंगळवारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आ. राजेश पाटील व माजी आ. संध्यादेवी कुपेकर यांनी इच्छुकांशी संवाद साधला. ‘गोकूळ’साठी २ मे रोजी मतदान होत आहे, दिवस कमी राहिल्याने पॅनलची घोषणा लवकर करून उमेदवारांना प्रचारासाठी वेळ द्यावा लागणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत पॅनलला अंतिम स्वरूप द्यावे लागणार असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ व मंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. शाहू आघाडी जम्बो झाली आहे, साहजिकच इच्छुकांची संख्या अधिक आहे. अशा परिस्थितीत सगळ्यांचे समाधान होऊ शकत नाही. त्यामुळे उमेदवारीसाठी आग्रह करू नको, थांबावे लागले तर तयारी ठेवा, अशी सूचना दोन्ही मंत्र्यांनी केल्या.

मुलाखतीसाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, संग्रामसिंह कुपेकर, बाळासाहेब कुपेकर, मुकुंद देसाई, विष्णुपंत केसरकर, जयवंतराव शिंपी, अल्बर्ट डिसोझा, एम. के. देसाई, गोपाळराव पाटील, सचिन घोरपडे, सदाशिव चरापले, विजयसिंह मोरे, किरणसिंह पाटील, बयाजी शेळके, नितीन जांभळे, विद्याधर गुरबे आदी उपस्थित होते.

उमेदवारी निश्चित असणारे प्रचारात

ज्यांची उमेदवारी निश्चित आहे, त्यांना मुलाखतीसाठी बोलावले नव्हते. यामध्ये ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, शशिकांत पाटील-चुयेकर, नवीद मुश्रीफ, रणजीतसिंह कृ. पाटील, कर्णसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांचे उमेदवार आदी गैरहजर राहिले होते.

ठरावांच्या संख्येवरून दावे

मुलाखतीत आपण किती पक्षांशी एकनिष्ठ आहेत, हे पटवून देत असतानाच आपण किती ठराव गोळा केले, हेही सांगण्यात आले.