शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पक्षांतर नकोच, भाजपमध्ये गेलेल्यांची अवस्था बघा; ‘पी. एन. पाटील’ गटाच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 12:26 IST

कोल्हापूर : काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील हे गुरुवारी कोल्हापुरात येत असून त्यांच्यासोबत बैठक झाल्यानंतरच दिवंगत आमदार पी. एन. ...

कोल्हापूर : काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील हे गुरुवारी कोल्हापुरात येत असून त्यांच्यासोबत बैठक झाल्यानंतरच दिवंगत आमदार पी. एन. पाटील गटाची पुढची राजकीय दिशा स्पष्ट करूया, असा निर्णय सोमवारी श्रीपतरावदादा बँकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. भोगावती साखर कारखान्यासाठी पक्षांतर करू नका, अशी उघड भूमिका ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी घेतल्याने पाटील गटासमोर पेच निर्माण झाला आहे. बैठकीला राहुल व राजेश पाटील दोघेही उपस्थित नव्हते.परिते (ता. करवीर) येथील भोगावती साखर कारखाना आर्थिक अडचणीत आहे. कारखान्याला मदत हवी असेल तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील व जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील यांनी महायुतीसोबत यावे, असा प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी दोघांना पक्षात येण्याची ऑफर दिली. तर, भाजपमधूनही विचारणा होऊ लागल्याने ‘करवीर’ मतदारसंघात गेल्या आठ-दहा दिवसापासून राहुल पाटील यांच्या पक्षांतराची जाेरदार चर्चा सुरू आहे.या पार्श्वभूमीवर प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. ‘भोगावती’चे अध्यक्ष शिवाजी पाटील म्हणाले, ‘भोगावती’ साखर कारखाना टिकला पाहिजे, सध्या कारखान्यासमोर अडचणींचा डोंगर आहे. कारखाना कार्यक्षेत्रात विधानसभेला ७२ हजार मते आहेत. शासनाकडून अनुदान मिळाले नाहीतर अडचणी वाढणार आहेत.यावर, कारखाना अडचणीत आहे म्हणून पक्षांतर करायचे का? अशी विचारणा विश्वनाथ पाटील, बी. एच. पाटील यांनी केली. प्राचार्य आर. के. शानेदिवाण म्हणाले, आमदार सतेज पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेत ‘भोगावती’ची अडचण सांगितली आहे. गडबडीने निर्णय घेऊ नका, गुरुवारी कोल्हापुरात येत आहे. आपण व राजेश पाटील जिल्हा बँकेचे संचालक आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करून कारखान्याला मदत देण्याबाबत सांगूया, असे त्यांनी सांगितले.सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालीच काँग्रेसमध्ये काम करुया, पण ‘राहुल’ व ‘राजेश’ यांनी मतदारसंघात फिरले पाहिजे, अशी महत्त्वाची सूचना बी. एच. पाटील यांनी केली.

यावर, सतेज पाटील यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर पुढील दिशा ठरवूया, असा निर्णय झाला. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील, ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दिगंबर मेडशिंगे, ए. डी. पाटील, पी. डी. धुंदरे आदी उपस्थित होते.भाजपमध्ये गेलेल्यांची अवस्था बघाकाँग्रेसच्या पडत्या काळात पक्षाला सोडून जाणे उचित नाही. काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्यांची अवस्था बघा, असेही काहींनी निदर्शनास आणून दिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण