Kolhapur: अंबाबाईच्या दानपेट्यांतील रकमेची मोजणी पूर्ण झाली, किती कोटींची देणगी मिळाली..जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 12:31 IST2025-05-24T12:27:06+5:302025-05-24T12:31:05+5:30
भाविकांची पावसातही दर्शनासाठी गर्दी

Kolhapur: अंबाबाईच्या दानपेट्यांतील रकमेची मोजणी पूर्ण झाली, किती कोटींची देणगी मिळाली..जाणून घ्या
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या खजिन्यात २ कोटी ६ लाख २६ हजार ८२१ इतकी घसघशीत देणगीची भर पडली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून सोमवारपासून सुरू असलेली दानपेट्यांतील रकमेची मोजणी शुक्रवारी पूर्ण झाली. देवीचा वार असल्याने शुक्रवारीही ७० हजारांवर भाविकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला.
सध्या पाऊस सुरू असला, तरी उन्हाळी सुट्ट्यांमुळे अंबाबाई दर्शनासाठी परस्थ भाविकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून जोर धरलेल्या पावसामुळे गुरुवारी ही गर्दी रोडावली होती. शुक्रवारीही दुपारी १२ वाजेपर्यंत पावसाचा चांगलाच जोर होता. त्यानंतर मात्र, दिवसभरात रिमझिम पाऊस पडत राहिला.
शुक्रवार हा देवीचा वार असल्याने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सायंकाळपर्यंत ७० हजारांवर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. शनिवार, रविवारी सलग सुट्टी असल्याने असाच किंवा त्याहून जास्त भाविक येतील, अशी शक्यता आहे.
पेटी क्रमांक : रक्कम
पेटी क्र १ : ५१,४०,८४३
पेटी क्र २ : ७२,०९,२२९
पेटी क्र. ३ : ६,७९,९२१
पेटी क्र.४ : २,९१,२०९
पेटी क्र.५ : १,८६,२१३
पेटी क्र.६ : ३,०७,६९८
पेटी क्र.७ : ४५,५१,५७२
पेटी क्र.८ : ४,३७,५९७
पेटी क्र. ११ : १४,३०,४४२
पेटी क्र.१२ : ३,९२,०९६
एकूण : २ कोटी ०६ लाख, २६ हजार ८२१