किणीत कुत्र्यांची शर्यत पडली महागात, सात जणांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:29 IST2021-09-06T04:29:03+5:302021-09-06T04:29:03+5:30

या प्रकरणी विशाल नाईक, ओंकार नाईक, रोहित मंडले (सर्व रा. किणी), रोहीत बाबासोा चौगुले, अजित सुरेश चौगुले, भारत ...

Dog races costly, crime against seven people | किणीत कुत्र्यांची शर्यत पडली महागात, सात जणांविरोधात गुन्हा

किणीत कुत्र्यांची शर्यत पडली महागात, सात जणांविरोधात गुन्हा

या प्रकरणी विशाल नाईक, ओंकार नाईक, रोहित मंडले (सर्व रा. किणी), रोहीत बाबासोा चौगुले, अजित सुरेश चौगुले, भारत अशोक चव्हाण, प्रताप मारुती चव्हाण (सर्व रा. उचगाव, शांतिनगर, ता. करवीर) यांच्यासह अज्ञात सात जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्याद पोलिस अंमलदार सुरेश राजाराम सुतार यांनी दिली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पाळीव प्राण्यांच्या शर्यती भरवण्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली असताना किणी-भादोले रस्त्यावर किणीतील तिघांनी बेकायदेशीर कुत्र्यांची शर्यत स्पर्धा आयोजित केली होती. यासाठी आठ ते दहा कुत्र्यांना घेवून त्यांचे मालक उपस्थित होते. यातील उचगाव येथील कुत्र्यांच्या मालकांनी त्यांना उपाशी ठेवून स्पर्धेला घेऊन आले होते. याबाबत वडगाव पोलिसांनी सात जणांसह अन्य अज्ञातावर कारवाई केली.

Web Title: Dog races costly, crime against seven people