रोटरी मिडटाऊनतर्फे डॉक्टर्स डे साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:16 IST2021-07-03T04:16:09+5:302021-07-03T04:16:09+5:30

यावेळी रोटरी मिडटाउनच्या अध्यक्षा भारती नायक यांनी रोटरी आणि डॉक्टर्स यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. नेत्ररोगतज्ज्ञ ...

Doctor's Day Celebration by Rotary Midtown | रोटरी मिडटाऊनतर्फे डॉक्टर्स डे साजरा

रोटरी मिडटाऊनतर्फे डॉक्टर्स डे साजरा

यावेळी रोटरी मिडटाउनच्या अध्यक्षा भारती नायक यांनी रोटरी आणि डॉक्टर्स यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. प्रीतम शहा यांनी डोळ्यांचे उपचार व डॉ. वासंती पाटील यांनी म्युकरमायकोसिसची माहिती दिली. डॉ. मीरा कुलकर्णी यांनी पोलिओ निर्मूलनाप्रमाणे कोरोनामुक्तीच्या लढ्यासाठी कार्यरत राहून त्यावर विजय मिळवावा, असे आवाहन केले. यावेळी डॉ. करुणाकर नायक, सचिन लाड, नरेन पाटील, देवयानी चव्हाण, डॉ. सचिन शिंदे, मारुती पवार, डॉ. दिग्विजय पाटील, लेखापरीक्षक विवेक भावसार, रितू वायचळ, नितेश मणियार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

--

फोटो नं ०२०७२०२१-कोल-प्रकाश संघवी

ओळ : रोटरी मिडटाउन तर्फे डॉक्टर्स डे व चार्टर्ड अकाउंटंट डे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

---

Web Title: Doctor's Day Celebration by Rotary Midtown