शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

किल्ल्यांची अवहेलना नको...

By admin | Updated: November 22, 2015 00:01 IST

युवराज संभाजीराजे छत्रपती : वसंतगडावर शिवकाळ; सातारा-कोल्हापूरचे छत्रपती पहिल्यांदाच आले एकत्र

सातारा : ‘ज्या राजांनी मोघलांशी हातमिळवणी केली, त्यांच्या किल्ल्यांचे संवर्धन होते. मग शिवरायांच्या किल्ल्यांची अशी अवहेलना का? दुर्ग संवर्धनासाठी मी वाट्टेल ते करायची तयारी ठेवली आहे. नव्या सरकारने किमान समितीची स्थापना तरी केली. भले आजवर त्या समितीवर एक रुपयाही खर्च केला नाही. सध्या आमची ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका आहे. संवर्धनाबाबत योग्य पावले उचलली नाहीत तर मावळ्यांच्या साथीने कठोर पावले उचलण्याशिवाय पर्याय नाही,’ असा इशारा युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी दिला. सरसेनापती हंबीरराव बाजी मोहितेंच्या भूमीत किल्ले वसंतगडावर महाराष्ट्राच्या तिसऱ्या दुर्ग संमेलनाची सुरुवात झाली. सरसेनापतींच्या समाधीसमोर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व संभाजीराजे छत्रपती यांनी मशाल प्रज्ज्वलित करून उद्घाटन केले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी संमेलनाचे स्वागताध्यक्ष पांडुरंग बलकवडे, निमंत्रक दीपक प्रभावळकर, शिवव्याख्याते नितीन बानुगडे-पाटील, प्रा. के. एन. देसाई, डॉ. संदीप महिंद यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. वसंतगड अनेक मोठ्या व ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे, हा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला दिशा देईल, त्यामुळेच राज्यसरकारकडे पाठपुरावा करून वसंतगडसाठी पन्नास लाखांचा निधी देणार असल्याची घोषण शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील यांनी केली. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. वसंतगडावर राज्यभरातील मावळ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. (प्रतिनिधी) दोन छत्रपती एकत्र साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे आणि आणि कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती या दोन्ही गाद्यांचे प्रतिनिधी एकत्र येणार असल्यामुळे अनेकांमध्ये उत्सुकता होती. मावळे तर हा प्रसंग याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी आतुर होते. दोघेही एकत्र आले, एकमेकांचा मानपान केला आणि सर्वजण धन्य-धन्य झाले. दुर्ग संमलनामुळेच दोन्हीही छत्रपती एकत्र आले, असे संभाजीराजे म्हणताच उपस्थितांनी त्यांना जयघोषात प्रतिसाद दिला. कार्याध्यक्ष शंभूराज यांना टोला तिसऱ्या दुर्ग संमेलनाचे आमदार शंभूराज देसाई कार्याध्यक्ष आहेत. परंतु ते स्वत: किल्ल्यावर आले नाहीत, त्यामुळे अनेक वक्त्यांनी त्यावर टोलेबाजी केली. संभाजीराजेंनी तर राज्यातील सर्वच आमदारांना रायगडाची पायी ट्रीप घडावावी किंवा मंत्रिमंडळाची एखादी बैठक रायगडावर घ्यावी, त्याशिवाय त्यांच्या डोक्यात शिवरायांचे विचार शिरणार नाहीत, असा घणाघात केला.