शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

चुकीच्या पद्धतीने घरफाळा नको

By admin | Updated: March 11, 2017 00:05 IST

कृती समितीची मागणी : घरफाळा वाढीला विरोध; महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासन शहरातील मिळकतधारकांवर चुकीच्या पद्धतीने घरफाळा आकारत असून सन २०११ पासून वसूल केलेल्या वीस टक्के जादा घरफाळ्याची रक्कम मिळकतधारकांना परत करावी आणि यापुढे चुकीच्या पद्धतीने घरफाळा आकारला जाऊ नये, अशी मागणी येथील सर्वपक्षीय घरफाळा वाढ विरोधी कृती समितीने आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे केली. कृती समितीच्या शिष्टमंडळाने आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. शिष्टमंडळात अ‍ॅड. बाबा इंदूलकर, दिलीप देसाई, बाबा पार्टे, प्रसाद जाधव, सुरेश गायकवाड, जयकुमार शिंदे, जहिदा मुजावर, वैशाली महाडिक, सविता पाटील, वंदना जाधव, शोभा खेडकर, सुनीता राऊत, कविता कोंडेकर, गायत्री राऊत, रुपाली पाटील आदींचा समावेश होता. यावेळी झालेल्या चर्चेत बाबा इंदूलकर यांनी महापालिका ज्या पद्धतीने घरफाळा आकारते ती पद्धत चुकीची असल्याचा दावा केला. इमारतीचे किंवा जमिनीचे भांडवली मूल्य निश्चित करण्याकरीता जमिनीचे किंवा इमारतीचे चटई क्षेत्र हा घटक आयुक्तांनी विचारात घेण्याचा आहे; परंतु सन २०११-१२ पासून महासभेच्या मान्यतेनुसार घरफाळा हा भांडवली मूल्यावर आधारीत वसूल करण्याचे धोरण ठरविले. महानगरपालिकेने या कामासाठी नियमावली तयार केली असली तरी त्यास शासनाकडून मान्यता घेतलेली नाही तशी मान्यता घेणे अनिवार्य होते. शासनाच्या आदेशाला हरताळ फासून इमारतीचे भांडवली मूल्य ठरविण्यासाठी चटई क्षेत्र विचारात न घेता बांधीव क्षेत्र विचारात घेतले. त्यामुळे घरफाळ्याची आकारणी वीस टक्क्याने जादा झाल्याचा दावा इंदूलकर यांनी केला. महापालिकाने २०११-१२ पासून आतापर्यंत चुकीचा घरफाळा वसूल केल्याने त्याची रक्कम जवळपास तीस कोटी होत असून ती परत करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. (प्रतिनिधी)पद्धत योग्यच - कारंडेज्या शहरात रेडिरेकनर निश्चित करण्यात आलेला नाही, त्या शहरात चटई क्षेत्राचा विचार करावा, असा नियम आहे. मात्र, कोल्हापूर शहरात रेडिरेकनरचे दर निश्चित झाले असल्याने महानगरपालिकेने स्वीकारलेली घरफाळ्याची पद्धत योग्य असल्याचे घरफाळा विभागाचे प्रमुख दिवाकर कारंडे यांनी यावेळी सांगितले. तर आयुक्त शिवशंकर यांनी तुम्ही उपस्थित केलेले मुद्दे कायदेशीरदृष्ट्या तपासून घेतले जातील, असे सांगितले.