शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दंगलीतून चुली पेटत नाहीत

By admin | Updated: October 8, 2014 21:47 IST

प्रकाश आवाडे यांचे आवाहन : इचलकरंजीतील कामगार चाळीत पदयात्रा

इचलकरंजी : कॉँग्रेस पक्षाने मंजूर केलेल्या योजना आम्ही इचलकरंजीत आणल्या असून, त्या मी केल्या म्हणून वल्गना करणाऱ्या आणि जनतेचा प्रतिनिधी म्हणवून घेणाऱ्यांना लोकप्रतिनिधीचे काम करता आले नाही. मात्र, त्यांनी सवलतीच्या दरात मिळणाऱ्या विजेची चोरी केली. कष्टाला कोणतीही जात नसते अन् दंगलीतून कधीही चुली पेटत नसतात. या निवडणुकीत त्यांना चोख उत्तर मिळेल, असे प्रतिपादन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले.येथील कामगार चाळ येथून प्रचार पदयात्रेला सुरूवात करण्यात आली. त्यानंतर पाटील वाडा, सिद्धार्थ हौसिंग सोसायटी, महात्मा गांधी हौसिंग सोसायटी, इंडस्ट्रियल इस्टेट, समाजवादी प्रबोधिनी, शाहूनगर, बालाजी प्रोसेसर्स परिसर, जोशी दवाखाना परिसरात ही पदयात्रा निघाली. त्यानंतर इंडस्ट्रियल इस्टेटमधील चौकात झालेल्या कॉर्नर सभेत आवाडे बोलत होते. शहर झोपडपट्टीमुक्त करण्याचे ध्येय उराशी बाळगले असून, त्यादृष्टीने पावलेही टाकली आहेत. त्यानुसार जयभीमनगर व नेहरूनगर याठिकाणी घरकुलांचे काम सुरू असून, लवकरच सर्वच झोपडपट्ट्यांचे आहे त्याचठिकाणी पुनर्वसन करून प्रत्येकाला त्याच्या हक्काचे घरकुल मिळणार आहे. या कामासंदर्भात गत पाच वर्षात विद्यमान आमदारांनी काहीचा पाठपुरावा केला नाही. उलट या चांगल्या कामात आडवा पाय मारण्याचे काम केले आहे. ज्या शहराने वस्त्रोद्योगात जागतिक पटलावर नाव कोरले, त्याच शहराची मान व प्रतिष्ठा आमदारांनी वीज चोरी करून खाली घालवली. रवी रजपुते यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन अरुण कांबळे यांनी केले. सुदीप वडिंगे यांनी आभार मानले. याप्रसंगी नगरसेवक तानाजी पोवार, विनोद आवळे, संतोष कांदेकर, गणेश जाधव, आदींची भाषणे झाली.नगरसेविका रेखा रजपुते, प्रमिला जावळे, रंगराव लाखे, प्रकाश आवळे, शशिकांत कांबळे, नारायण यरगुंटला, झाकीर जमादार, शेखर वराळे, अरुण निंबाळकर, प्रदीप कांबळे, बयाबाई गेजगे, नरेश नगरकर, राजू भडंगे, शांताराम लाखे, बाबासाहेब देसाई, चंद्रकांत कांबळे, अमित काकडे, प्रवीण कांबळे, विलास कुरणे, अशोक कांबळे, संतोष मुळे, उमेश कांबळे, प्रशांत आवळे, बबन कांबळे, नितीन चव्हाण उपस्थित होते. (प्रतिनिधी)