जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट १६ वरून १२ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 12:10 PM2021-07-09T12:10:33+5:302021-07-09T12:12:55+5:30

CoronaVirus In Kolhapur : चाचण्या वाढविल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या जास्त दिसत असली तरी मागील तीन आठवड्यांत कोल्हापुरातील कोरोना पॉझिटिव्ह रेट १६ वरून १२ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे, तर ६० वर्षांवरील लसीकरणात राज्यात कोल्हापूर प्रथम क्रमांकावर आहे.

District positive rate from 16 to 12 percent | जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट १६ वरून १२ टक्क्यांवर

जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट १६ वरून १२ टक्क्यांवर

Next
ठळक मुद्देजिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट १६ वरून १२ टक्क्यांवर६० वर्षांवरील लसीकरणात प्रथम : कादंबरी बलकवडे

कोल्हापूर : चाचण्या वाढविल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या जास्त दिसत असली तरी मागील तीन आठवड्यांत कोल्हापुरातील कोरोना पॉझिटिव्ह रेट १६ वरून १२ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे, तर ६० वर्षांवरील लसीकरणात राज्यात कोल्हापूर प्रथम क्रमांकावर आहे.

नागरिकांनी दुसरा डोस घेऊन काही कालावधी जाईपर्यंत व जिल्ह्यातील लसीकरण ८० टक्क्यांपर्यंत जाईपर्यंत कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी गुरुवारी केली.

कोल्हापुरातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासंबंधी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी उपस्थित होते.

डॉ. बलकवडे म्हणाल्या, चाचण्या वाढविल्या असल्या तरी जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट आता कमी होत आहे. मागील आठवड्यात एक लाखावर चाचण्या करण्यात आल्या आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या ७५ हजार इतकी होती. या चाचण्यांमुळे लक्षणे नसलेल्यांमुळे किंवा सुपरस्प्रेडर ठरलेल्यांमुळे होणारा संसर्ग वाढण्यावर आळा बसणार आहे.

८ ते १२ पर्यंतचे वर्ग सुरू करण्याची कार्यवाही

काही गावांमध्ये पाचवीपासूनचे वर्ग सुरू झाले असून, शाळा सुरू करण्याबाबत संभ्रम आहे. याबाबत संजयसिंह चव्हाण म्हणाले, शासनाकडून दोन दिवसांत दोन आदेश आल्याने गोंधळ झाला असेल; मात्र जिल्हा परिषदेला ८ ते १२ वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे आदेश आले असून, त्याबाबत कार्यवाही केली जाईल.

गृहविलगीकरण झाले कमी

मागील महिन्यात झालेल्या बैठकीत राज्य शासनाने घरीच राहून उपचार घेत असलेल्या रुग्णांना कोविड सेंटरमध्ये दाखल करा, गृहविलगीकरणाचे प्रमाण कमी करा अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आता शहरातील गृहविलगीकरण ६७ वरून ४८ टक्क्यांवर, तर ग्रामीण भागातील प्रमाण ६५ टक्क्यांवरून ३५ टक्क्यांवर आणल्याचे डॉ. बलकवडे यांनी सांगितले.

करवीर, हातकणंगलेवर लक्ष केंद्रित

जिल्ह्यातील करवीर व हातकणंगलेत रुग्णांची संख्या जास्त आहे. यावर संजयसिंह चव्हाण म्हणाले, करवीर कोल्हापूर शहराजवळ असल्याने नागरिकांची ये-जा सुरू असते. हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजीत वस्त्रोद्योग व भोवतालच्या गावांमध्ये परप्रांतीय नागरिक मोठ्या प्रमाणात असल्याने या दोन्ही तालुक्यांत रुग्णांची संख्या जास्त आहे. मात्र, येथील हॉटस्पॉट ठरत असलेल्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित करून पॉझिटिव्हिटी रेट कमी करण्याचा प्रयत्न असेल. काही तालुक्यांमध्ये ग्रामपंचायतींची संख्या मोठी आहे, त्या तुलनेत पॉझिटिव्ह रेट ६ ते ९ टक्क्यांपर्यंत कमी आहे.

कालावधी : आरटीपीसीआर चाचण्या : पॉझिटिव्ह रुग्ण : टक्केवारी

  • १७ ते २३ जून : २६ हजार ४६२ : ४ हजार १७९ : १५.७९
  • २४ ते ३० जून ३८ हजार ८४५ : ५ हजार ४६२ : १४.०६
  • १ ते ७ जुलै : ६० हजार ९५० : ७ हजार २३९ : ११.८८

 

१२७ गावे कोरोनामुक्त


तालुका : ग्रामपंचायती

  • आजरा : ३९
  • भुदरगड : ०
  • ग़डहिंग्लज : ३
  • गगनबावडा : २०
  • चंदगड : १३
  • हातकणंगले : ३
  • कागल : १०
  • करवीर : १७
  • पन्हाळा : ४
  • राधानगरी : ३
  • शाहुवाडी : १३
  • शिरोळ २

एकूण : १२७

Web Title: District positive rate from 16 to 12 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.