शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज -मतदान साहित्य केंद्रांवर दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 20:28 IST

gram panchayat Election Kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यातील १२ तालुक्यातील ३८६ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. त्यासाठी ईव्हीएम मशीन, कंट्रोल युनिट, मतदानाची शाई असे साहित्य घेवून गुरुवारी कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना झाले. मतदान सुरळित पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून सकाळी साडे सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात होईल.

ठळक मुद्देनिवडणूक पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज मतदान साहित्य केंद्रांवर दाखल

कोल्हापूर : जिल्ह्यातील १२ तालुक्यातील ३८६ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. त्यासाठी ईव्हीएम मशीन, कंट्रोल युनिट, मतदानाची शाई असे साहित्य घेवून गुरुवारी कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना झाले. मतदान सुरळित पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून सकाळी साडे सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात होईल.त्यासाठी गुरुवारी सर्व तालुक्यांच्या ठिकाणी निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना मतदानाचे साहित्य देण्यात आले. तत्पूर्वी ईव्हीएम मशीन हाताळणी, व मतदान प्रक्रिया कशी पार पाडावी याचे अखेरचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर कर्मचारी साहित्य घेवून केंद्राच्या ठिकाणी रवाना झाले.

जिल्ह्यात शिरोळ, कागल व गडहिंग्लज या तीन तालुक्यांसाठी संपूर्ण आचारसंहिता लागली असून सर्वच तालुक्यांमध्ये आचारसंहितेचे योग्य पालन होत आहे की नाही हे पाहण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आचारसंहिता, सोशल मिडिया व पेड न्यूज समिती नियुक्त करण्यात आली आहे. आचारसंहिता अंमलबजावणीसाठी ६३ पथके कार्यरत असणार आहेत.निवडणुकीच्या निकालानंतर ३० दिवसात उमेदवारांनी खर्च सादर करायचा असून त्यासाठी १२ समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उमेदवारांना खर्च सादर करण्यासाठी ट्रू वोटर ॲपची सुविधा उपलब्ध आहे. तर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी मतदान केंद्रावरील सर्व कर्मचाऱ्यांना प्रतिबंधात्मक साहित्य व कीट पुरवण्यात आले आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर