शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
Top Marathi News Live: इराणने अमेरिकेला पाठवला नवा प्रस्ताव, पाकिस्तान मध्यस्थ
3
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
4
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
5
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
6
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
7
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
8
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
9
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
10
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
11
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
12
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
13
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
14
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
15
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
16
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
17
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
18
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
19
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
20
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
Daily Top 2Weekly Top 5

किशोरवयीन मुलींना निकृष्ट आहाराचे वितरण

By admin | Updated: September 6, 2015 23:27 IST

चंदगड पंचायत समिती सभा : संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करावा

चंदगड : शासनाच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे किशोरवयीन मुलींना पुरवला जाणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप सदस्य निंगू गुरव यांनी करून पंचायत समिती बैठकीत या निकृष्ट धान्याचे नमुनेच सादर केले. यामुळे निकृष्ट आहार पुरविणाऱ्या ठेकेदाराचा ठेकाच रद्द करावा, अशी मागणी शुक्रवारी झालेल्या पंचायत समितीच्या बैठकीत सदस्यांनी केली. अध्यक्षस्थानी सभापती ज्योती पवार-पाटील होत्या.गटविकास अधिकारी एस. डी. सोनावणे यांनी प्रास्ताविक केले. कक्ष अधिकारी बाजीराव पाटील यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. प्रभारी प्रकल्प अधिकारी एस. आर. नरवाडकर यांनी महिला बालकल्याण विभागाचा अहवाल सादर केला. यावेळी सदस्य निंगू गुरव यांनी या विभागातर्फे पुरविण्यात येणारा शालेय पोषण आहार निकृष्ट दर्जाचा आहे. शेंगदाणे कुबाटलेले, तर गहू कुजलेले आहेत आणि अशाच धान्याचा पुरवठा तालुक्यात केला जात आहे. हा पुरवठा तत्काळ बंद करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली. नरवाडकर यांनी ठेकेदाराने जबरदस्तीने निकृष्ट आहार देण्याचा प्रयत्न केल्यास तो अंगणवाडी सेविकांनी स्वीकारू नये, तसेच याबाबत कार्यालयाशी अथवा पर्यवेक्षकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधावा, असे आवाहन केले.पाणीपुरवठा विभागाचे अभियंता एस. ए. सावळगी यांनी दूषित पाणी नमुने सापडलेल्या गावांना आरोग्य विभागाने तत्काळ कर्मचारी पाठवून पाणी शुद्धिकरण मोहीम राबवावी, अशी मागणी केली. कधीही दुष्काळ न पडणाऱ्या चंदगड तालुक्यात पाऊस पडावा म्हणून प्रार्थनाही केली. उपसभापती शांताराम पाटील यांनी पाणी योजनांची अर्धवट कामे करणाऱ्या ठेकेदारांना कळवूनही अद्याप कामे पूर्ण झालेली नाहीत, ती करून घ्यावीत, अशी सूचना केली.ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. एस. एस. माने यांनी बदलत्या वातावरणामुळे तालुक्यात सर्दी व तापाचे प्रमाण वाढले आहे. यातून स्वाइन फ्लूसारखा आजारही होईल. अशा आजाराची लक्षणे आढळल्यास नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी आळंदे यांनी अहवाल सादर करून राजर्षी शाहू ग्रामस्वच्छता अभियानाची कार्यशाळा गुरुवारी (दि. १०) असून, सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. होसूरसह अन्य गावांना पाणीपुरवठा वीज बिलात सवलत मिळावी, अशी मागणी उपसभापती पाटील यांनी केली. यावर अभियंता अष्टेकर यांनी ज्या ग्रामपंचायती एकरकमी बिल भरतील, त्यांना सवलत देण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले. यावेळी हसिना नाईकवाडी, अनुराधा पाटील, तुळसा तरवाळ, नंदिनी पाटील यांनी चर्चेत भाग घेतला. (प्रतिनिधी)