दानोळीमध्ये कोरोनाबाधित कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:19 IST2021-05-31T04:19:04+5:302021-05-31T04:19:04+5:30

दानोळी : येथील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ माने यांनी कोरोनाबाधितांच्या कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून माणुसकीचे दर्शन दिले. या सामाजिक ...

Distribution of essential items to the Corona-affected family in Danoli | दानोळीमध्ये कोरोनाबाधित कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

दानोळीमध्ये कोरोनाबाधित कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

दानोळी : येथील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ माने यांनी कोरोनाबाधितांच्या कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून माणुसकीचे दर्शन दिले. या सामाजिक कार्याबद्दल माने यांचे कौतुक होत आहे.

एखाद्या कुटुंबातील सदस्य कोरोनाबाधित झाला, तर त्या कुटुंबातील सर्व सदस्यांकडे बाधित असल्यासारखे पाहिले जाते. त्यांना जीवनवश्यक वस्तू आणण्यासाठी सुध्दा बाहेर पडता येत नाही अथवा या घराकडे कोणी फिरकत सुध्दा नाही. तसेच कोरोनामुळे रोजंदारीवर घर चालवणाऱ्यांची आर्थिकस्थिती विस्कळित झाली असून क्वॉरंटाईन काळात घर चालवायचे कसे, असा प्रश्न त्यांना पडलेला असतो. याची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ गावडे यांनी कोरोनाबाधित कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

या वेळी सर्जेराव शिंदे, गोपाळ माने, राजाराम माने, बंडू खिलारे, भोला माने, दगडू मंडले, संदीप माने, विशाल नाईक, विजय माने, रुक्साना नदाफ उपस्थित होते.

Web Title: Distribution of essential items to the Corona-affected family in Danoli