शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूकसंबंधी सर्व प्रश्नांची उकल

By admin | Updated: March 9, 2015 23:58 IST

निवडणूक आयोग : सोळाशे प्रश्नांची खास पुस्तिका

विश्वास पाटील ल्ल कोल्हापूर निवडणूक ग्रामपंचायतीची असो की जिल्हा परिषदेची; ती लढविताना उमेदवारांपासून सामान्य माणसापर्यंत आणि राजकीय कार्यकर्त्यापासून ते निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांच्याच मनांत वारंवार उपस्थित होणाऱ्या प्रश्नांची (एफएक्यू - फ्रिक्वेंटली आस्कड क्वेशन्स) उत्तरे आता राज्य निवडणूक आयोगच देणार आहे. त्यासाठी खास पुस्तिका करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, त्यामध्ये तब्बल सोळाशे प्रश्नांची उत्तरे देण्यात येणार आहेत. राज्य निवडणूक आयोगावर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वच्छ, भयमुक्त व पारदर्शक वातावरणात घेण्याची संवैधानिक जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सदस्य संख्या निश्चित करणे, प्रभाग रचना करणे, मतदार याद्या करणे, प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राबविणे ही कार्यवाही पार पाडावी लागते. या सगळ्या निवडणुका गावपातळीवर लढविल्या जात असल्याने त्यामध्ये सर्वसामान्य जनतेचा मोठा सहभाग असतो. या प्रक्रियेसंदर्भात सर्वसामान्य जनता, निवडणूक अधिकारी, कर्मचारी, राजकीय पक्ष, उमेदवार यांच्या मनांत विविध प्रश्न असतात. त्याची उत्तरे देऊन कुणाच्याच मनात संदिग्धता राहू नये अशी एकरूप उत्तरे दिली जाणे आवश्यक असते. म्हणूनच निवडणूक आयोगाने असे प्रश्न एकत्रित करून त्यांची उत्तरे देण्यासाठी समितीच स्थापन केली आहे. राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी या पुस्तिकेसाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी विविध कायद्यांची पुस्तके, भारत निवडणूक आयोगाचे प्रश्न, त्या त्या अधिकाऱ्यांचा निवडणूक कामकाजातील अनुभव या सगळ्यांचा आधार घेण्यात आला आहे. त्यासाठी पुण्यात ‘यशदा’मध्ये कार्यशाळाही झाली आहे. डॉ. श्रीकर परदेशी हे पिंपरी-चिंचवड महापालिकेत आयुक्त होते, तेव्हा त्यांनी महापालिकेच्या कामकाजाबद्दल माहिती देणारी अशी पुस्तिका काढली होती. आता त्यांनीच नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे ‘सारथी’ नावाची पुस्तिका प्रकाशित केली आहे. ती मोबाईल अ‍ॅपवर व पीडीएफ स्वरूपातही उपलब्ध आहे. त्यामुळे तेच-तेच प्रश्न विचारायला येणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली. त्यातूनच निवडणूक कामासाठी अशा पुस्तिकेची कल्पना सुचली आहे. अशी आहे समिती... या समितीचे राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक निरीक्षक डॉ. श्रीकर परदेशी हे अध्यक्ष आहेत. त्याशिवाय डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (अप्पर मुद्रांक, मुंबई), बी. एम. कांबळे (उपमहानिरीक्षक, नोंदणी औरंगाबाद), संतोष पाटील (एमआयडीसी, नांदेड), दीपक नलवडे (उपजिल्हाधिकारी,कोल्हापूर) जगदीश मिनियार (सहायक आयुक्त, मनरेगा, नागपूर), उदय टेकाळे (उपायुक्त, पुणे महापालिका), कमलकिशोर फुटाणे (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर), रवींद्र धुरजड (उपजिल्हा निवडणूक अधिकारी, अमरावती), रत्नाकर वाघमारे (उपायुक्त, नांदेड महापालिका) यांची समिती नियुक्त केली आहे. निवडणूक आयोगाचे अवर सचिव नितीन वागळे हे या समितीचे समन्वयक आहेत. काय असेल पुस्तिकेत... तीन मुले असतील तर तुम्ही निवडणूक लढविण्यास पात्र ठरू शकता का, चिन्हवाटपाचे नियम कसे आहेत, अर्ज दाखल करताना काय दक्षता घ्यायची, प्रभाग रचना नेमकी होते तरी कशी, निवडणुकीत काय केले म्हणजे तो गुन्हा ठरतो, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे या पुस्तिकेत असतील. आम्ही सुमारे सोळाशे प्रश्नांची यादी तयार केली असून, त्यांतील निम्म्या प्रश्नांची उत्तरेही तयार केली आहेत. प्रत्येक उत्तराला कायद्याचा काय आधार आहे, हेदेखील देण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे सगळे काम झाल्यानंतर दोन महिन्यांत ते राज्य निवडणूक आयोगाकडे सुपूर्द करण्यात येईल. आयोगातर्फे ही माहिती वेबसाईट व पुस्तिकेच्या स्वरूपात प्रसिद्ध होईल. - डॉ. श्रीकर परदेशी, अध्यक्ष, सातत्याने विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची मसुदा समिती, राज्य निवडणूक आयोग, मुंबई