Kolhapur- Chandgad Politics: मुश्रीफांशी दोनवेळा चर्चा, पण गाफील ठेवले; आमदार शिवाजीराव पाटील यांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 14:38 IST2025-11-11T14:34:25+5:302025-11-11T14:38:17+5:30
Local Body Election: समविचारींना सोबत घेऊन भाजपाच्या झेंड्याखाली नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका ताकदीने लढवून जिंकणार

Kolhapur- Chandgad Politics: मुश्रीफांशी दोनवेळा चर्चा, पण गाफील ठेवले; आमदार शिवाजीराव पाटील यांचे स्पष्टीकरण
चंदगड : महायुतीतील घटक पक्ष म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत चंदगड नगरपंचायत, जिल्हा परिषदेमध्ये भाजपासोबतराष्ट्रवादी काँग्रेसने यावे यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी मुंबई व कोल्हापूर अशी दोनवेळा चर्चा केली. पण, त्यांनीच स्पष्ट न सांगता पुन्हा यावर बसून निर्णय घेऊ, असे सांगून मला गाफील ठेवले आणि त्यांच्या मनातील नैसर्गिक युती केल्याची प्रतिक्रिया आमदार शिवाजी पाटील यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेश पाटील व शरदचंद्र पवार गटाच्या डॉ. नंदिनी बाभूळकर हे दोन्ही गट एकत्र आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी युतीविषयी चर्चा केली नाही, असे सांगितले. याचे स्पष्टीकरण देताना पाटील यांनी मत मांडले.
वाचा: भाजप बोलेना म्हणूनच शरद पवार पक्षाशी आघाडी - हसन मुश्रीफ
आमदार पाटील म्हणाले, नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीत युतीसाठी स्वतःहून मुश्रीफ यांच्याशी प्रयत्न केले. पण, त्यांनी स्पष्ट संकेत न देता मला चर्चेत ठेवून आपली नैसर्गिक युती सोमवारी केली. त्यांना शुभेच्छा असून समविचारींना सोबत घेऊन भाजपाच्या झेंड्याखाली नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका ताकदीने लढवून जिंकणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.