शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-शिवसेनेतील अंतर आता न संपणारेच!

By admin | Updated: August 25, 2015 00:06 IST

महापालिकेच्या निवडणुक

विश्वास पाटील ल्ल कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपबरोबर आघाडी करण्याची अजूनही तयारी असल्याचा प्रस्ताव शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी दिला असला तरी भाजपला आता मागे फिरणे अवघड असल्याचे वास्तव आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर इतकी चिखलफेक झाली आहे की, ती विसरून एकी होणे हाच त्यातील खरा अडसर आहे. भाजपचे नेते व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यातील टोकाचा दुरावा युती न होण्यात झाला आहे. महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपमध्ये आपण एकत्र येऊ, असा नुसता विचारही कोणत्याच टप्प्यावर झाला नाही. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शहरात भाजपच्या महेश जाधव यांना विधानसभा निवडणुकीत मिळालेली ४० हजार मते. या निकालानंतर शिवसेनेने महेश जाधव यांना व जाधव यांनी क्षीरसागर यांना आपले खरे प्रतिस्पर्धी मानले. तिथेच युतीला सुरूंग लागला. जो भाजप मुंबई महापालिकेत शिवसेनेबरोबर युती करणार, असे कोल्हापुरात झालेल्या राज्य अधिवेशनात जाहीर करतो. त्याच भाजपने कोल्हापूर महापालिकेबाबत मात्र नेमकी त्याच्या उलटी भूमिका घेतली. त्याचा पायाही भाजपचे वाढलेले मतदान हाच होता. भाजपने शिवसेनेला फाट्यावर मारून ताराराणी आघाडीशी संगत केली आहे. कुणी किती जागा लढवायच्या हे निश्चित झाले आहे. निम्मे उमेदवारही निश्चित झाले आहेत, असे असताना आता तेथून मागे येऊन शिवसेनेशी घरोबा करणे बरेच अवघड आहे. या दोन पक्षांतील नेत्यांतील संबंध सौहार्दाचे असते, तर ते याघडीलाही शक्य झाले असते. पक्षापेक्षा नेत्यांतील राजकीय कटुता हाच युती होण्यातला अडसर आहे, परंतु तरीही शिवसेनेच्या राऊत यांनी ‘आघाडीचे अजूनही दोर कापलेले नाहीत,’ असे म्हटले आहे. त्यामागे सहानुभूती मिळविण्याचे राजकारण आहे. बघा, आम्ही युतीसाठी केव्हाही तयार होतो; परंतु भाजपलाच ते नको होते, असा ‘ब्लेम गेम...’ प्रचारात ते करू शकतात. राऊत यांचे शिवसेनेतील स्थान महत्त्वाचे आहे. त्याचवेळेला त्यांना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भाजपमधील ताकद व शिवसेना-भाजप युतीतील महत्त्वाचा दुवा म्हणूनही असलेले स्थान माहीत आहे. त्यामुळेच त्यांनी हा प्रस्ताव ठेवून राळ उडवून दिली आहे.