शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गोकुळची निवडणूक झाल्यावर कोरोना आठवला का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:40 IST

कोल्हापूर : गेले महिनाभर कोरोनाने जिल्ह्यात धुमाकुळ घातला असताना राजकारण्यांना ‘गोकुळ’ची निवडणूक महत्त्वाची होती, ती संपल्यावर यांना कोरोना आठवला ...

कोल्हापूर : गेले महिनाभर कोरोनाने जिल्ह्यात धुमाकुळ घातला असताना राजकारण्यांना ‘गोकुळ’ची निवडणूक महत्त्वाची होती, ती संपल्यावर यांना कोरोना आठवला का, जीवनावश्यक अशी ‘गोकुळ’ची निवडणूक झाल्यानंतर कोल्हापुरात कडक बंद, पीपीई कीट घालून मतदान होत असेल तर नागरिकांना कीट घालून व्यवसाय करू द्या., कोल्हापुरातील राजकारण्यांचा जाहीर निषेध, अशा शब्दांत राजकीय नेत्यांवर जहरी टीका करत कोल्हापूरकरांनी समाजमाध्यमांवर आपला संताप व्यक्त केला आहे.

गेले महिनाभर जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप सुरू आहे. मात्र, त्या काळातही उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन ‘गोकुळ’ची निवडणूक लढवली गेली. याकाळात तालुक्यांमध्ये प्रचार मेळावे घेतले गेले, त्यानिमित्ताने मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येत होते, काही ठरावधारकांचा कोरोनाचे मृत्यूदेखील झाला. हे सगळं सुरू असतानााही ‘गोकुळ’ची निवडणूक पुढे ढकलली गेली नाही. उलट कोरोनाच्या सगळ्या निर्बंधांना पायदळी तुडवत ही निवडणूक पार पाडली गेली आणि मंगळवारी मतमोजणी सुरू झाली की राजकीय नेत्यांनी तातडीची बैठक घेऊन जिल्ह्यात १० दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला. या प्रकारावर समाजमाध्यमांद्वारे नागरिकांनी संताप व्यक्त केला.

कोरोनाचा प्रकोप सुरू असताना राजकीय नेते व त्यांचे कार्यकर्ते गोकुळ निवडणुकीच्या राजकारणात मग्न होते. या लोकांनी स्वतःचे आर्थिक व राजकीय हित साधण्यासाठी कोल्हापूरच्या जनतेला वाऱ्यावर सोडले. रेमडेसिविर इंजेक्शन, कोरोना लस, ऑक्सिजन बेडची सोय याचा आढावा एकाही राजकारण्याने घेतला नाही. तुमच्या नादाला लागून कोणाचे हित झाले नाही म्हणून आम्ही प्रामाणिक प्रयत्न करून रोजीरोटी मिळविण्याचा प्रयत्न करत होतो, ते पण तुम्ही लॉकडाऊन करून मोडून पाडत आहात. आता आमच्यासमोर मरण आहेच फक्त कोरोनाने मरायचे, उपाशीपोटी मरायचे की हार्ट अटॅकने मरायचे एवढेच बाकी आहे. तुमची घराणेशाही, सत्तेची आणि पैशांची भूक भस्म्यारोगा सारखीच आहे. अशा शब्दांत राजकीय नेत्यांवर टीका करण्यात आली आहे.

----

समाजमाध्यमावरील संदेश

-काल गोकुळात रंग खेळले हरी, नागरिका आता जपून रहा तुझ्या घरी, नाही तर जाशील देवाघरी

-गोकुळ लयच मोठं हाय की राव आयपीएल पण इलेक्शन झाल्यावर रद्द केली.

-पाऊस पण गोकुळच्या इलेक्शनसाठी थांबला होता की काय

-. गोकुळच लोणी खाण्यासाठी जेवढे घासला तेवढे लस मिळविण्यासाठी घासला असता तर कोल्हापूर जिल्हा लसीकरणात अव्वल ठरला असता..

--