शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कोरे-पाटील यांच्यातच धुमशान--शाहूवाडी एकूण मतदार २,६६,७७२

By admin | Updated: October 9, 2014 00:19 IST

मतविभागणीच ठरणार निर्णायक : आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी जोरात

राजाराम कांबळे - मलकापूर -शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघात जनसुराज्य, शिवसेना, कॉँग्रेसचा प्रचार शिगेला पोहोचला आहे, तर मतविभागणीचा फायदा व तोट्याची गणिते मांडण्यात नेत्यांसह कार्यकर्ते गुंग आहेत. गत निवडणुकीत पन्हाळा तालुक्यातून विनय कोरे हे एकमेव उमेदवार होते. पन्हाळ्यातील एकगठ्ठा मतांमुळे ते विजयी झाले होते. यावेळी त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी अमर पाटील यांनी प्रचार यंत्रणा जोरात राबवून खासदार राजू शेट्टी व सदाभाऊ खोत, माजी आमदार यशवंत पाटील यांना प्रचारात उतरले आहे. शाहूवाडीतून माजी आमदार सत्यजित पाटील व काँग्रेसचे कर्णसिंह गायकवाड रिंगणात आहेत. विनय कोरे यांनी वारणा साखर कारखाना, दूध संघाचे संचालक, जिल्हा परिषदेचे सदस्य, दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची फौज प्रचारात उतरविली आहे. राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनीदेखील प्रचारात आघाडी घेतली आहे. शाहूवाडी तालुक्यातून सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील यांनी प्रचाराची दुसरी फेरी पूर्ण केली आहे. शाहूवाडी तालुक्यातून जिल्हा परिषद मतदारसंघनिहाय मेळावे घेतले आहेत. माजी आमदार बाबासाहेब पाटील, ‘गोकुळ’च्या संचालिका अनुराधा पाटील या देखील प्रचारात सामील झाल्या आहेत. एकंदरीत शाहूवाडीचा आमदार करायचा या उद्देशाने सेना कार्यकर्ते कामाला लागले आहेत. सेनेचे उपजिल्हाप्रमुख जयवंतराव काटकर, तालुका उपजिल्हाप्रमुख दत्ता पोवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हंबीरराव पाटील प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. कॉँग्रेसचे कर्णसिंह गायकवाड यांनी वाड्या-वस्त्या, धनगरवाडे पिंजून काढले आहेत. सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचून आपण निवडणुकीस का उभे आहोत हे पटवून देत आहेत. त्यांच्यासोबत महिला बालकल्याण माजी सभापती भाग्यश्री गायकवाड, जिल्हा परिषदेचे सदस्य योगिराज गायकवाड, माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड प्रचारात उतरल्या आहेत. मनसेच्या संजय पाटील यांची ‘एकला चलो रे’ची भूमिका आहे. राष्ट्रवादीचे मानसिंगराव यांनी उघड भूमिका घेतली नसली, तरी त्यांचे पुत्र रणवीरसिंह गायकवाड यांनी राष्ट्रवादीची फौज सत्यजित पाटील यांच्या प्रचारात उतरविली आहे. दलित महासंघाचे राज्य अध्यक्ष रमेश चांदणे, शेकापचे भारत पाटील यांनीदेखील सेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. गतनिवडणुकीत विनय कोरे यांना शाहूवाडीतून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सर्जेराव पाटील-पेरीडकर, नामदेव खोत यांच्या प्रयत्नांमुळे २४ हजार मते मिळाली होती. कानसा खोऱ्यात सत्यजित पाटील यांना वाढणारी मते रोखण्याचे काम कोरे यावेळी करीत आहेत. कोरे यांच्या प्रचाराची धुरा सर्जेराव पाटील, नामदेव खोत सांभाळत आहेत. येथे खरी लढत आमदार विनय कोरे व सत्यजित पाटील यांच्यात शाहूवाडीत होणार आहे. एकंदरीत पन्हाळ्यातील मतविभागणीच शाहूवाडी-पन्हाळ्याचा आमदार कोण होणार हे ठरविणार आहे.