शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नाही तर राज्यभर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात नुसते आरोप झाले तर मंत्री स्वत:हून राजीनामा देतात. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात नुसते आरोप झाले तर मंत्री स्वत:हून राजीनामा देतात. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या कृत्याचा स्वत:हून कबुलीनामा दिला आहे. संवेदनशील मंत्री असल्याने ते राजीनामा देतील. त्यांनी दिला नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा घ्यावा, त्यांनी घेतला नाही तर भाजप राज्यभर आंदोलन करेल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.

चंद्रकांत पाटील म्हणाले, धनंजय मुंडे यांच्याबाबत झालेली तक्रारी आणि त्यांनी दिलेला कबुलीनामा, अशा प्रकारची कॅबिनेट मंत्र्यांच्या बाबतची घटना महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच घडली आहे. रेणू शहा यांनी अत्याचाराबाबत केलेल्या आरोपाची पोलीस शहानिशा करतील, त्यातून काय निष्पण व्हायचे ते होईल. आरोप चुकीचे असतील रेणू शहांवर कारवाई होईल. मात्र, करूणा शहा यांच्याबाबतचे पंधरा वर्षे असलेले संबंध, त्यातून दोन मुले झाल्याची कबुली स्वत: मुंडे यांनी दिली. हे सर्व नैतीकता आणि कायदा या दोन्हींच्या चौकटीत बसत नाही. विधानसभेवेळी निवडणूक आयोगाला खोटी माहिती दिल्याने त्यांची निवडणूक रद्द होऊ शकते, असेही पाटील यांनी सांगितले.

पवार यांचे राजकारण शुद्ध

राष्ट्रवादीने मुंडेंचा राजीनामा घ्यायचा का त्यांना उठाबशा काढायला लावायच्या हा त्यांचा प्रश्न आहे. पण, शरद पवार यांनी ५० वर्षांत एकाला बाजूला करून दुसऱ्याला घेतले, हा राजकारणाचा भाग सोडला तर शुद्ध राजकारण केले. त्यामुळे ते निर्णय घेतील, असे पाटील यांनी सांगितले.

जयंतराव तर जनता तुम्हाला माफ करणार नाही

मुंडे यांच्यावरील आरोप अद्याप सिद्ध झाले नसल्याने राजीनाम्याची गरज नसल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, केलेल्या गुन्ह्याची स्वत: कबुली दिल्यानंतर चौकशी कसली करता? मित्र म्हणून माफी देणार असाल तर ठीक आहे, मात्र जनता तुम्हाला माफ करणार नाही.