उत्रेत ३५ लाखांची विकासकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:17 IST2021-05-31T04:17:56+5:302021-05-31T04:17:56+5:30

पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यांतील उत्रे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध केल्याने आमदार डाॅ. विनयरावजी कोरे यांनी गावाला विविध विकासकामांसाठी ...

Development works worth Rs 35 lakh in the north | उत्रेत ३५ लाखांची विकासकामे

उत्रेत ३५ लाखांची विकासकामे

पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यांतील उत्रे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध केल्याने आमदार डाॅ. विनयरावजी कोरे यांनी गावाला विविध विकासकामांसाठी ३५ लाख निधी उपलब्ध करून दिला.

आमदारांचा स्थानिक विकास २० लाख निधीतून पाणवठा रस्त्यासाठी १० लाख आणि सरदार हांडे घरापासून ते धनगर गल्लीपर्यंतचा रस्त्यासाठी १० लाख निधी खर्च करण्यात आला आहे. २५/१५ योजनेतून सरदार हांडे घरापासून बाळूमामा मंदिरापर्यंतचा रस्ता १० लाख रुपये तर डोंगरीविकास योजनेतून ५ लाख रु. तामजाई मंदिरापासून मेन रोडपर्यंतचा रस्ता करण्यात आला आहे. या कामासाठी काॅन्ट्रॅक्टर दिलीप पाटील यांचे विशेष सहकार्य मिळाले. कामाचे उदघाटन सरपंच अभिजित पाटील, उपसरपंच छाया पाटील, गटप्रमुख विजय पाटील, प्रधान पाटील, लक्ष्मण मगर सर्व ग्रामपंचायत सदस्य व काॅन्ट्रॅक्टर दिलीप पाटील उपस्थित होते.

Web Title: Development works worth Rs 35 lakh in the north