अंबाबाईच्या भाविकांच्या ऑनलाइन फसवणुकीबाबत देवस्थानची 'सायबर'कडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 15:15 IST2026-03-18T15:12:34+5:302026-03-18T15:15:37+5:30

लोकमत इफेक्ट : पोलिसांनी घेतली दखल

Devasthan Committee files complaint with Cyber Crime regarding online fraud of Ambabai devotees | अंबाबाईच्या भाविकांच्या ऑनलाइन फसवणुकीबाबत देवस्थानची 'सायबर'कडे तक्रार

अंबाबाईच्या भाविकांच्या ऑनलाइन फसवणुकीबाबत देवस्थानची 'सायबर'कडे तक्रार

कोल्हापूर : गुढीपाडव्याचे औचित्य साधून श्री अंबाबाईच्या नावे भाविकांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक करणाऱ्या समाजमाध्यमावरील एआय जनरेटेड जाहिरातीविरोधात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने मंगळवारी सायबर क्राइमकडे, तसेच जुना राजवाडा पोलिस ठाण्यातदेखील तक्रार केली. या व्हिडीओबाबत पोलिस तपास करीत असून, गुन्हा दाखल केला जाईल.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांतील देवता असलेल्या अंबाबाईला गुढीपाडव्याला साडी अर्पण करण्याची कोणतीही पद्धत नाही. इथे पैसे घेऊन कोणतेही बाह्य धार्मिक विधी केले जात नाहीत. असे असताना गेल्या काही दिवसांपासून यजमान डॉट इन या समाजमाध्यमावरील फेसबूक पेजवर अंबाबाई मंदिराचा एआय जनरेटेड व्हिडीओ करून ३५१ रुपयांची मागणी केली जात आहे. फक्त ३५१ रुपये भरून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर देवीला साडी अर्पण करा, असे आवाहन केले जात आहे.

यापूर्वीदेखील अशा अनेक सोशल साइट्सवरून अंबाबाई भक्तांची फसवणूक केली जात असतानाही त्याची दखल घेतली गेली नाही. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व श्रीपूजकांनी तक्रार केल्यानंतरही पोलिसांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही.

याबाबतचे वृत्त सोमवारी कोल्हापूर ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हाधिकारी अमाेल येडगे यांनी समितीला तक्रार करण्यास सांगितले. मात्र, सायबर क्राइम विभागाने याची दखल घेत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे याची चौकशी केली. समितीनेदेखील जुना राजवाडा पोलिस ठाण्याला तक्रार नोंदवली. यासह सायबर क्राइम विभागाकडेही तक्रार देण्यात आली आहे.

कसा केला जातो तपास...

देवस्थान समितीने या व्हिडीओ, तसेच अन्य सोशल साइटच्या लिंक सायबर क्राइम विभागाला दिल्या आहेत. हे व्हिडीओ कुठे तयार झाले, कुणी बनवले, त्याचा क्रिएटर कोण, व्हायरल कुणी केले, किती व्हायरल झाले, संबंधित लिंकवरून बँक खात्यात काही व्यवहार झाले आहेत का, या सर्व बाबींची तपासणी केली जाईल. देवस्थान समितीशी चर्चा करून गुन्हा नोंद केला जाईल. त्यानंतर फेसबूक, गुगलसारख्या कंपन्यांकडून ही साइट बंद करण्याची कारवाई केली जाईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

Web Title : अंबाबाई मंदिर ट्रस्ट ने भक्तों को निशाना बनाने वाले ऑनलाइन धोखाधड़ी पर शिकायत दर्ज की

Web Summary : अंबाबाई मंदिर प्रशासन ने साइबर अपराध पुलिस को एआई-जनित विज्ञापनों द्वारा भक्तों को धोखा देने की सूचना दी। धोखेबाजों ने देवी को साड़ियाँ चढ़ाने के लिए दान मांगने वाले नकली वीडियो का इस्तेमाल किया। रचनाकारों को खोजने और धोखाधड़ी वाली साइटों को बंद करने के लिए जांच जारी है।

Web Title : Ambabai Temple Trust Files Complaint Over Online Fraud Targeting Devotees

Web Summary : Ambabai temple authorities reported AI-generated ads defrauding devotees to cybercrime police. Scammers used fake videos requesting donations to offer saris to the deity. Investigation underway to find creators and shut down fraudulent sites.