शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

मटकाकिंग दोड्डमणीचा अड्डा उद्ध्वस्त

By admin | Updated: August 31, 2015 00:26 IST

दोड्डमणी फरार : तीन एजंटांसह सहाजणांना अटक; ७८ हजारांचा माल जप्त

सांगली : येथील शंभरफुटी, चांदणी चौक व सिव्हिल हॉस्पिटल परिसरात मटक्याचे साम्राज्य वाढविलेल्या मटकाकिंग काशिनाथ दोड्डमणी याच्या अड्ड्यावर शनिवारी रात्री पोलिसांनी छापे टाकले. छाप्याची चाहूल लागल्याने दोड्डमणी फरार झाला. मात्र त्याच्या तीन एजंटांसह मटका खेळण्यास आलेल्या तीन ग्राहकांना अटक केली आहे. सात मोबाईल, रोकड, मटक्याचे साहित्य असा ७८ हजाराचा माल जप्त करण्यात आला आहे.अटक केलेल्यांत एजंट प्रकाश पांडुरंग लवाटे (वय ४९, रा. शामरावनगर), दुंडाप्पा अण्णाप्पा अजूर (२४, रा. शंभरफुटी रस्ता), संतोष नारायण पाटील (३७, त्रिमूर्ती कॉलनी) व मटका खेळायला आलेले ग्राहक ज्ञानेश्वर शरणाप्पा बिरगे (२७, रेवतगाव, ता. इंडी, सध्या धामणी रस्ता, सांगली), मारुती परशुराम बंडगर (३२) व अनिल बाबूराव वायदंडे (४३, दोघे रा. दत्तनगर, विश्रामबाग, सांगली) यांचा समावेश आहे. या सर्वांना रविवारी सकाळी न्यायालयात उभे करण्यात आले होते. पोलिसांनी सर्वांना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. परंतु न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली आहे. फरार झालेल्या दोड्डमणीचा शोध सुरु असल्याचे सांगण्यात आले.जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश गुंडाविरोधी पथक व विशेष पथकाला दिले आहेत. दोन्ही पथकांनी संयुक्तपणे प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक विजयकुमार मराठे, आरती बनसोडे यांच्या मदतीने दोड्डमणीच्या शंभरफुटी रस्त्यावर सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकला. या छाप्यात एजंट दुंडाप्पा अजूर व मटका खेळायला आलेले तीन ग्राहक सापडले. त्यांच्याकडून पाच मोबाईल, नऊ हजाराची रोकड, मटक्याचे साहित्य असा एकूण २५ हजाराचा माल जप्त केला.सिव्हिल हॉस्पिटल व चांदणी चौक परिसरातही दोड्डमणीचे अड्डे सुरू असल्याची माहिती मिळताच पथकाने तिथेही एकाचवेळीछापे टाकले. तिथे एजंट प्रकाश लवाटे व संतोष पाटील सापडले. त्यांच्याकडून ५२ हजार ५१५ रुपयांची रोकड, दोन मोबाईल, मटक्याचे साहित्य असा ५४ हजार ५२५ रुपयांचा माल जप्त केला. या दोन्ही कारवायांची चाहूल लागल्याने दोड्डमणी फरार झाला. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरु होता. पण तो सापडला नाही. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोनच दिवसांपूर्वी या पथकाने मिरजेत बुकीमालक संतोष कोळी याचा अड्डा उद्ध्वस्त केला होता. कोळीसह सहाजणांना अटक केली होती. त्यानंतर पुन्हा सांगली शहरातही छापासत्र सुरू झाल्याने अवैध व्यावसायिकांमध्ये खळबळ माजली आहे. कारवाईच्या भीतीने काही ठिकाणचे मटका अड्डे बंद झाले होते. दरम्यान, पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांनी या कारवाईची दखल घेऊन, अवैध धंदे बंद झाले पाहिजेत, असा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)दोड्डमणी पुन्हा रेकॉर्डवरपोलिसांच्या रेकॉर्डवर पूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेला मटकाकिंग यल्लाप्पा दोड्डमणी याचा काशिनाथ हा मुलगा आहे. यल्लाप्पा दोड्डमणी ‘मामा’ या नावाने प्रसिद्ध आहे. गेल्या काही वर्षापासून त्याचा मटका अड्डा बंद होता. पण पोलिसांनी कारवाई केल्याने ‘मामा’ आणि त्याचा मुलगा काशिनाथ पोलिसांच्या रेकॉर्डवर आल्याने पुन्हा चर्चेत आले आहेत. याची शहरात जोरदार चर्चा सुरु आहे.