आमरोळी येथील धोकादायक ट्रान्सफॉर्मर बदलण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:24 IST2021-04-10T04:24:31+5:302021-04-10T04:24:31+5:30

आमरोळी (ता. चंदगड) येथे प्राथमिक शाळेनजीकचा धोकादायक विद्युत ट्रान्सफॉर्मर त्वरित बदलावा, अशी मागणी ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीकडे केली आहे. ...

Demand for replacement of dangerous transformer at Amroli | आमरोळी येथील धोकादायक ट्रान्सफॉर्मर बदलण्याची मागणी

आमरोळी येथील धोकादायक ट्रान्सफॉर्मर बदलण्याची मागणी

आमरोळी (ता. चंदगड) येथे प्राथमिक शाळेनजीकचा धोकादायक विद्युत ट्रान्सफॉर्मर त्वरित बदलावा, अशी मागणी ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीकडे केली आहे.

पोरेवाडी गावाकडे जाणाऱ्या वळणांवर आमरोळी येथेच महावितरण कंपनीने विद्युत डीपी बसवलेली आहे. या डी.पी.जवळ लागूनच प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व गावाला पाणीपुरवठा करणारी नळपाणी योजनेची मोठी टाकी आहे.

या ट्रान्सफॉर्मरला आधार देणारे खांबही वाकले आहेत. त्यामुळे ही डी.पी. धोकादायक स्थितीत उभी आहे. सोसाट्याचा वारा व पावसाळ्यात ही डी. पी. कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे रहदारीच्या ठिकाणी धोकादायक स्थितीत असणारी विद्युत डीपी दुसऱ्या ठिकाणी बदलण्याची मागणी आमरोळी ग्रामस्थानी केली आहे.

--------------------------

* फोटो ओळी : आमरोळी (ता. चंदगड) येथील धोकादायक स्थितीत उभा असलेला विद्युत ट्रान्सफाॅर्मर.

क्रमांक : ०९०४२०२१-गड-०९

Web Title: Demand for replacement of dangerous transformer at Amroli