कुंभोज येथे विविध विकासकामांचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:25 IST2021-04-04T04:25:03+5:302021-04-04T04:25:03+5:30

दरम्यान, कुंभोज ते वाठार तर्फ उदगाव रस्ता डांबरीकरण, बिरदेव मंदिर परिसरात संरक्षक भिंत, मुस्लिम समाज दफनभूमी संरक्षक भिंत बांधकाम, ...

Dedication of various development works at Kumbhoj | कुंभोज येथे विविध विकासकामांचे लोकार्पण

कुंभोज येथे विविध विकासकामांचे लोकार्पण

दरम्यान, कुंभोज ते वाठार तर्फ उदगाव रस्ता डांबरीकरण, बिरदेव मंदिर परिसरात संरक्षक भिंत, मुस्लिम समाज दफनभूमी संरक्षक भिंत बांधकाम, अंतर्गत रस्ते डांबरीकरण आदी पूर्ण झालेल्या विकासकामांचा लोकार्पण माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, शिक्षण व अर्थ समिती सभापती प्रवीण यादव यांच्या हस्ते झाला. यावेळी कुंभोज येथील ग्रामसचिवालयाची नवीन इमारत पूर्वीच्या ठिकाणाऐवजी प्राथमिक आरोग्य पथकाच्या परिसरात बांधण्यात यावी, अशी मागणी वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांनी केली.

कार्यक्रमास ग्रा. पं. सदस्य संभाजी मिसाळ, आप्पासाहेब पाटील, अशोक आरगे, श्रीकांत पालखे, संतोष माळी, शिवाजी माने, दिलीप मिसाळ, सदाशिव मिसाळ, कैलास चव्हाण, प्रियदर्शन पाटील, तुषार कोळी, राहुल पुजारी, निवास माने तसेच शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. सुरेश भगत यांनी आभार मानले.

फोटो ओळी-कुंभोज येथील विविध विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या हस्ते झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समिती सभापती प्रवीण यादव, वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Dedication of various development works at Kumbhoj