शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

थोडगे मारहाण अहवालावर दोन दिवसांत निर्णय

By admin | Updated: August 5, 2014 00:31 IST

पोलीस अधीक्षक शर्मा यांची माहिती

कोल्हापूर : बंकट थोडगे मारहाण प्रकरणाचा चौकशी अहवाल अद्याप माझ्याकडे आलेला नाही. दोन दिवसांत तो सादर होईल. त्यानंतर अहवालात काही तथ्य आढळल्यास दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी आज, सोमवारी दिली. गगनबावडा पंचायत समितीचे माजी सभापती आणि सामाजिक कार्यकर्ते बंकट थोडगे यांना करवीर पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा चौकशी अहवाल पोलीस उपअधीक्षक किसन गवळी यांनी शनिवारी आवक-जावक (टपाल) विभागाकडे सादर केला आहे. तो अहवाल अद्याप डॉ. शर्मा यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही. थोडगे हे कामानिमित्त करवीर तहसील कार्यालयाच्या आवारात आले असता एका कॉन्स्टेबलने त्यांना अरेरावी केली. त्याबाबत जाब विचारला असता चार ते पाच कॉन्स्टेबलनी त्यांना बेदम मारहाण केली. त्यावेळी त्यांचा शर्ट फाटला. आपल्याला विनाकारण मारहाण झाली म्हणून धरणे आंदोलन करण्याचा निर्णय थोडगे यांनी घेतला. हा प्रकार आमदार चंद्रदीप नरके यांना समजताच ते घटनास्थळी आले. यावेळी पोलिसांनी क्षमायाचना केली. त्यानंतर सामाजिक संस्थांनी हे प्रकरण चांगलेच ताणून धरले. अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्याकडे याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी केली. त्यानुसार त्यांनी चौकशी अधिकारी म्हणून किसन गवळी यांची नियुक्ती केली. गवळी यांनी या संपूर्ण प्रकरणाची गोपनीय पद्धतीने चौकशी पूर्ण करून अहवाल सादर केला आहे. आता या अहवालावर डॉ. शर्मा कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)