दुंडगेतील तरूणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:23 IST2021-02-12T04:23:53+5:302021-02-12T04:23:53+5:30

गडहिंग्लज : आठवड्यापूर्वी विषारी औषध प्राशन केलेल्या संतोष भीमा नाईक (वय १८, मूळ गाव चिंचेवाडी, सध्या रा. दुंडगे, ता. ...

Death of a young man in Dundge | दुंडगेतील तरूणाचा मृत्यू

दुंडगेतील तरूणाचा मृत्यू

गडहिंग्लज : आठवड्यापूर्वी विषारी औषध प्राशन केलेल्या संतोष भीमा नाईक (वय १८, मूळ गाव चिंचेवाडी, सध्या रा. दुंडगे, ता. गडहिंग्लज) या तरूणाचा उपचारादरम्यान छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयात मृत्यू झाला. त्याने विषारी औषध का घेतले, याचे कारण समजू शकले नाही.

मूळचा चिंचेवाडी येथील रहिवासी असणाऱ्या संतोषचे कुटुंब काही वर्षांपासून दुंडगे येथे वास्तव्याला आहे. त्याच्या वडिलांचे निधन झाले असून, गावातील एका वीट भट्टीवर मजुरी करून तो आईला हातभार लावत होता.

बुधवारी (दि. ३) त्याने विषारी औषध प्राशन केले. त्यामुळे उपचारासाठी त्याला येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, पुढील उपचारासाठी त्याला कोल्हापूरला हलविण्यात आले. याठिकाणी उपचारादरम्यान त्याचा आज (गुरूवारी) मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई व भाऊ असा परिवार आहे.

Web Title: Death of a young man in Dundge