शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या विरहाने मुलाचाही मृत्यू

By admin | Updated: December 16, 2014 23:18 IST

वृत्त समजताच कोल्हापूर, सांगली, बेळगावमधीलैं उद्योजक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, महसूल अधिकारी, आदींनी बाळेघोल येथे त्यांचे अंतिम दर्शन घेतले

सेनापती कापशी : बाळेघोल (ता. कागल) येथील हौसाबाई लक्ष्मण तोरस्कर (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने काल, सोमवारी निधन झाले. हे वृत्त कळताच त्यांचा मुलगा उद्योजक शंकरराव तोरस्कर त्याच दिवशी दुपारी तीन वाजता बाळेघोल येथे आले. आईवर अंत्यसंस्कार करून रात्री झोपल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचाही मृत्यू झाला. आई व मुलाचा एकाच दिवशी मृत्यू झाल्यामुळे शोककळा पसरली आहे.शंकरराव लक्ष्मण तोरस्कर (वय ६०) उद्योगपती म्हणून सुपरिचित आहेत. बाळेघोलसारख्या खेडेगावातून गरिबीवर मात करत जिद्दीने ते यशाच्या शिखरावर पोहोचले होते. तालुक्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना त्यांचे दातृत्व लाभले आहे.गेली अनेक वर्षे संघर्षातून त्यांनी आपले आयुष्य घडविले, जीवनात आलेल्या अनेक संकटांशी त्यांनी सहज सामना केला, पण आईच्या निधनाचे दु:ख ते पचवू शकले नाहीत. हे वृत्त समजताच कोल्हापूर, सांगली, बेळगावमधीलैं उद्योजक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, महसूल अधिकारी, आदींनी बाळेघोल येथे त्यांचे अंतिम दर्शन घेतले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली व मुलगा असा परिवार आहे. जानेवारीत त्यांच्या एकसष्ठीनिमित्त सेनापती कापशी येथील न्यायमूर्ती रानडे विद्यालयात मोठा कार्यक्रम होणार होता. त्याची तयारीही अंतिम टप्प्यात आली होती, पण नियतीला कदाचित हे मान्य नव्हते.