Kolhapur: शिरोळ बंधाऱ्याजवळ मृत माशांचा खच, दुषित पाण्यामुळे पंचगंगेच्या पाण्याला दुर्गंधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 12:42 IST2026-03-18T12:40:26+5:302026-03-18T12:42:20+5:30

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला

Dead fish waste near Shirol bandhara in Kolhapur, polluted water causes foul smell in Panchgange water | Kolhapur: शिरोळ बंधाऱ्याजवळ मृत माशांचा खच, दुषित पाण्यामुळे पंचगंगेच्या पाण्याला दुर्गंधी 

Kolhapur: शिरोळ बंधाऱ्याजवळ मृत माशांचा खच, दुषित पाण्यामुळे पंचगंगेच्या पाण्याला दुर्गंधी 

कुरुंदवाड: गेल्या काही दिवसांपासून पंचगंगा नदीत मिसळणाऱ्या काळेकुट्ट, प्रदूषित पाण्यामुळे मासे मृत्युमुखी पडत आहेत. शिरोळ बंधाऱ्याजवळ मृत माशांचा खच पडला आहे. रसायनयुक्त, मैलायुक्त सांडपाण्यामुळे पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे पंचगंगा काठच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शिरोळ तालुक्यातील पंचगंगा काठावरील नागरीक, विविध संघटना नदीप्रदूषण विरोधी आक्रमक झाले असतानाही दिवसेंदिवस दूषित पाण्याचा प्रश्न सुटण्याऐवजी गंभीर बनत चालला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दुर्लक्ष होत असल्याने दूषित पाण्यावरून संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

Web Title : कोल्हापुर: प्रदूषित पंचगंगा नदी में मृत मछलियाँ, दुर्गंध से लोग परेशान

Web Summary : प्रदूषित पंचगंगा नदी के कारण शिरोल बांध के पास मछलियाँ मरीं। रासायनिक और मैला युक्त पानी से दुर्गंध। जन स्वास्थ्य चिंताएँ बढ़ीं, आक्रोश और संघर्ष की संभावना।

Web Title : Kolhapur: Dead Fish Pile Up Due to Polluted Panchganga River

Web Summary : Polluted Panchganga river causes fish deaths near Shirol dam. Chemical and sewage waste contaminate water, creating stench. Public health concerns rise, prompting anger and potential conflict.