शहरं
Join us  
Trending Stories
1
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
2
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
3
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
4
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
5
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
6
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
7
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
8
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
9
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
10
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
11
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
12
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
13
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
14
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
15
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
16
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
17
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
18
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
19
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
20
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

आजीसह नातवाचा ‘कृष्णे’त बुडून मृत्यू

By admin | Updated: May 10, 2015 01:11 IST

अर्जुनवाड येथील घटना : नातवाला वाचविताना काळाचा घाला

शिरोळ : कृष्णा नदीत पाण्यात बुडणाऱ्या नातवाला वाचविताना आजीचाही बुडून मृत्यू झाला. अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथे शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. काशीबाई जगन्नाथ डोंगरे (वय ५५, रा. अर्जुनवाड) व वैभव शिवाजी शेळके (१०, रा. बेडग, ता. मिरज) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेची नोंद शिरोळ पोलिसांत झाली आहे. घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, चौथीची परीक्षा दिल्यानंतर उन्हाळी सुटी असल्याने बेडग येथील वैभव हा अर्जुनवाड येथे मामाकडे आला होता. शनिवारी दुपारी आजी काशीबाई डोंगरे जनावरे धुण्यासाठी कृष्णा नदीकाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत वैभवही होता. नदीत पोहत असताना अचानक वैभव पाण्यात बुडू लागला. आजीच्या निदर्शनास येताच त्यांनी पाण्यात धाव घेतली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने नातवाला वाचविण्याच्या प्रयत्नात त्याही बुडाल्या. ही घटना पुलावरून जाणाऱ्या भरत येवारे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी नदीपात्रात बुडणाऱ्या काशीबाई डोंगरे यांना पाण्यातून बाहेर काढले. वैभवलाही वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पाण्यात बुडाला. खासगी वाहनातून उपचारासाठी मिरज सिव्हील रुग्णालयात नेत असतानाच काशीबाई यांचा मृत्यू झाला. अर्जुनवाडमधील तरुणांनी वैभवचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. घटनास्थळी कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. पोलीस निरीक्षक विष्णू जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. काशीबाई डोंगरे यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना असा परिवार आहे, तर वैभवच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. आजी व नातवाचा बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत होती. (प्रतिनिधी)