शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
3
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
4
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
5
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
12
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
13
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
14
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
15
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
16
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
17
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
18
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
19
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
20
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
Daily Top 2Weekly Top 5

दत्त दालमियाचा वजन काटा बिनचूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:45 IST

पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील दत्त (दालमिया भारत शुगर कंपनी) साखर कारखान्याच्या वजनकाट्याची भरारी पथकाने भेट देऊन तपासणी ...

पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील दत्त (दालमिया भारत शुगर कंपनी) साखर कारखान्याच्या वजनकाट्याची भरारी पथकाने भेट देऊन तपासणी केली. कारखान्याचा वजनकाटा बिनचूक असल्याचा निर्वाळा भरारीपथकाचे प्रमुख कोल्हापूर प्रथम विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था वर्ग १ साखर यु. आर. कुंभार यांनी दिला.

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी साखर कारखान्यांचे वजनकाटे तपासण्यासाठी भरारीपथकाची नेमणूक करून, काटा तपासणीचा आदेश दिले आहेत. यापैकी प्रथम लेखापरीक्षक सहकारी संस्था यु. आर. कुंभार यांच्या नेतृत्वाखाली वैद्यमापन निरीक्षक ए. के. महाजन आणि पन्हाळा पोलीस काॅन्स्टेबल बी. डी. कांबळे यांनी अचानक दत्त दालमिया साखर कारखान्याच्या ऊस वजनकाट्याची तपासणी केली. यावेळी वजनकाट्यावर वजन करुन गव्हाणीकडे गेलेल्या ऊस भरलेल्या सात वाहनांची वजन पावती ताब्यात घेऊन त्यांचे पुन्हा वजन केले असता, केलेल्या वजनात कोणत्याही प्रकारची तफावत आढळून आली नाही.

याशिवाय २० किलोप्रमाणे चार हजार किलो वजनाची प्रमाणित वजनाने काट्यावर ठेवून पुन्हा तपासणी केली. यातही सर्व वजनकाटे सदोष असल्याची माहिती यु. आर. कुंभार यांनी सांगितले. याशिवाय प्रत्येक वाहनचालकाला वजन दर्शविणारे दर्शक केबिन बाहेर लावले आहेत. उसाच्या भर व रिकाम्या वाहनांचे एकाच वजनकाट्यावर वजन होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून दत्त दालमिया कारखान्याचा वजनकाटा बिनचूक असल्याचे प्रशस्तीपत्र अहवाल भरारीपथकाने कारखान्याला दिला. यावेळी जनरल मॅनेजर केन श्रीधर गोसावी, वरिष्ठ मॅनेजर (केन) संग्राम पाटील, केनयार्ड सुपरवायझर दिलीप पाटील, शेतकरी बाजीराव कदम, अजित शेलार, आर. के. संकपाळ, अशोक शेवाळे, वाहतूकदार, काटा कर्मचारी उपस्थित होते.