शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

‘जीवनदायी’त लुटणाऱ्या रुग्णालयांना दणका

By admin | Updated: June 1, 2015 00:16 IST

शासनाची कारवाई : ५३ रुग्णांना केले साडेतीन लाख रुपये परत

गणेश शिंदे - कोल्हापूर  केंद्र सरकारच्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या जिल्ह्यातील काही खासगी रुग्णालयांकडून पॅकेजपेक्षा जादा पैसे उकळलेले जात असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस येत आहे. गेल्या दीड वर्षात ज्या रुग्णांचे जादा पैसे घेतले आहेत, अशा ५३ रुग्णांना सुमारे साडेतीन लाख रुपये शासनाने परत केले आहेत. अशाप्रकारे रुग्णांकडून पॅकेजपेक्षा जास्त पैसे घेणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळात सुरु झालेल्या या योजनेमध्ये ९७१ आजारांवरील उपचारांचा समावेश आहे. कुटुंबातील एका व्यक्तीला साधारण ५० हजारांपासून दीड लाखापर्यंतच्या पॅकेजचा लाभ होतो. दरम्यान, जिल्ह्यात प्रथम २७ खासगी रुग्णालये या योजनेत समाविष्ट होती. ती संख्या आता ३१ वर जाऊन पोहोचली आहे. विशेषत: या योजनेत समाविष्ट असलेल्या काही खासगी रुग्णालयांकडून रुग्णाला ‘हृदयाची झडप बदलण्यासाठी हलक्या दर्जाच्या स्प्रिंगऐवजी अत्याधुनिक व दर्जेदार स्प्रिंग घालूया,’ असे सांगून जादा पैसे उकळण्याचे तसेच दमदाटी करून हा प्रकार कोणाला सांगितल्यास व याबाबत कोणाकडे तक्रार केल्यास रुग्णावर पुढील उपचार होणार नाहीत, अशी भीती दाखविण्याचे प्रकार होत असल्याचे रुग्णांच्या नातेवाइकांकडून बोलले जात आहे. अशी असते प्रक्रिया...मुंबई येथील राजीव गांधी जीवनदायी सोसायटीच्या एम. डी. इंडियाचे या योजनेवर नियंत्रण आहे. या योजनेमधील रुग्णालयांना नॅशनल इन्श्युरन्स कॉर्पोरेशन (एन.आय.सी.)कडून रुग्णालयाच्या बँक खात्यामध्ये आॅनलाईन पैसे (परतावा) जमा होतात. त्यासाठी रुग्णालय व्यवस्थापनाला सर्वप्रथम त्या रुग्णाचे तंदुरुस्त छायाचित्र व ११ दिवसांनंतर त्याचे तपासणी प्रमाणपत्र आॅनलाईन एन.आय.सी.ला पाठवावे लागते. रुग्णालय पॅकेजपेक्षा अनावश्यक पैसे घेत असेल, तर संबंधित रुग्णाने त्यासंबंधीची लेखी तक्रार राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक अथवा माझ्याकडे द्याव्यात. याबाबत लेखी तक्रार आल्यास संबंधित रुग्णालयावर निश्चित कारवाई करू.- डॉ. अशोक देठे, जिल्हा समन्वयक, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना.रुग्णालयाचे बिल (देयक) कमी करून देतो, असे सांगून पैसे मागत असल्याची लेखी तक्रार त्या रुग्णाने विभागाकडे दिली पाहिजे. तसेच संबंधिताने पैशाची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यास लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली आम्ही कारवाई करू.- पद्मा कदम, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर.