शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

तामजाई पठारावरील मोकाट जनावरांकडून पिकांचे नुकसान

By admin | Updated: April 12, 2015 23:57 IST

५० ते ६० गावांना फटका : ऊस, मका, भुईमूग, गहू पिकांचे लाखोंचे नुकसान

प्रकाश पाटील- कोपार्डे -पन्हाळा, गगनबावड्याच्या सीमेवर असणाऱ्या विस्तीर्ण तामजाई पठारावरील मोकाट रानटी जनावरांनी कळे ते साळवण व कळे ते किसरूळ, काळजवडे दरम्यान ५० ते ६० गावांतील शेतातील पिके फस्त केल्याने लाखोंचे नुकसान होत आहे. या मोकाट रानटी जनावरांमध्ये गायी व बैल जास्त संख्येने आहेत. किमान ४०० ते ५०० जनावरांचा हा कळप आहे.पठारावर ४०० ते ५०० गायी व बैल असा समावेश असलेला मोकाट जनावरांचा कळप आहे. सध्या या पठारावर पाणी व ओल्या चाऱ्याची कमतरता असल्याने या जनावरांनी अन्नाच्या शोधार्थ पठाराखालील शेतीकडे आपला मोर्चा वळविला आहे. हा कळप मध्यरात्री पठाराखाली उतरून मका, भुईमूग, गहू यासारखी पिके फस्त करून पुन्हा पठारावर पोबारा करीत असल्याने येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत.कळेपासून साळवणपर्यंतची आसगाव, खेरिवडे, मुठकेश्वर, लोंघे, किरवे, त्याचबरोबर पन्हाळ्याच्या पश्चिमेकडील काटेभोगाव, पोहाळे, बाजारभोगाव, आदींसह लहान-मोठ्या वाड्यांतील शेतकरी या मोकाट रानटी जनावरांच्या त्रासाने त्रस्त आहेत. याबाबत वनविभागाकडूनही पळवाट शोधत ही जनावरे वन्य प्राण्यात येत नसल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.यासाठी काही गावांत ग्रामस्थांनी रात्री आपल्या गावच्या हद्दीत हा कळप येऊ नये म्हणून गस्ती पथके तयार करून स्वत:च संरक्षण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, तर काही गावांनी आपल्या गावाकडे येणाऱ्या या कळपाच्या मार्गावर तारेचे कुंपण अथवा चरी मारून तो थांबविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तरीही हा कळप कधी येतो आणि पिके फस्त करतो, याचा शेतकऱ्यांना अंदाजच येत नसल्याने लाखोंचे नुकसान होताना दिसत आहे.वनविभागाकडून दुर्लक्ष-- या गायींचे वनगाईमध्ये वर्गीकरण होत नाही. तामजाई पठारावर वनगाई असल्याची नोंदही वनविभागाकडे नाही. त्यामुळे हा जनावरांचा कळप मोकाट असल्याचे वनखात्याकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आम्ही गवा अथवा इतर वन्य प्राण्यांवर कारवाई करू शकत नाही, असे वनविभागाकडून शेतकऱ्यांना सांगितले जाते.कितीही शेताची राखण केली, तरी पिकांचे संरक्षण करणे अवघड झाले आहे. हा कळपच मोठा असल्याने हुसकावण्याचा प्रयत्न केल्यास अंगावर धावून येऊन हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. मग डबे वाजवून, मशाली पेटवून, फटाके वाजवून पिकांच्या संरक्षणाचा प्रयत्न सुरू आहे.- गणपती मोळे, शेतकरी,खेरिवडे, ता. पन्हाळा.उसातील आंतरपीक मक्यावर या मोकाट जनावरांचा डोळा असतो. यावर्षी आम्ही उसात मकाच घातलेला नाही. मका नाही तरी पण उसाचा फडशा पाडला जातोय. गावकऱ्यांनी तारेचे कुंपण कळपाच्या मार्गावर मारले आहे. चरी मारल्या आहेत. तरीदेखील या जनावरांचा बंदोबस्त करणे कठीण झाले आहे.- सुरेश मोळे, शेतकरी,लोंघे, ता. गगनबावडा.$$्रिजनावरे आक्रमकतामजाई पठारावर असणाऱ्या धनगर लोकांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी शहराचा आसरा घेतला आहे. त्यांनी त्यावेळी आपल्याकडील जनावरे येथेच सोडून दिली. आता ही संख्या वाढत जाऊन तो ४०० ते ५०० जनावरांचा कळप झाला आहे. यातील गायी थोड्या भित्र्या असल्या, तरी बैल अत्यंत आक्रमक असतात. कळपाजवळ जाण्याचे धाडस होत नाही, असे येथील शेतकरी सांगतात.