शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पानसरे हत्येप्रकरणी रोज आढावा बैठक

By admin | Updated: September 19, 2015 00:38 IST

संजय वर्मा : पोलीस महासंचालकांचे ‘आयजीं’ना आदेश

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्येप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी ‘सनातन’चा पूर्णवेळ काम करणारा संशयित समीर गायकवाड याला अटक केली आहे. या हत्येच्या तपासाचा रोज आढावा घेऊन माहिती देण्याचे आदेश राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी दिले आहेत. त्यानुसार विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात तपास अधिकाऱ्यांची शुक्रवारपासून आढावा बैठक घेत असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास वर्मा यांनी अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांची बैठक घेऊन तपासाबाबत आढावा घेतला. पानसरे हत्येप्रकरणी पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याने संशयित समीर गायकवाड याला अटक केली. त्यानंतर त्याच्या मुंबईतील प्रेयसीसह संकेश्वर येथील नातेवाइकांना ताब्यात घेतले. गेले तीन दिवस या प्रकरणी तपासप्रमुख व राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक संजयकुमार संशयितांकडे चौकशी करीत होते. या हत्येप्रकरणी काही महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. या संदर्भात तपास अधिकाऱ्यांची रोज आढावा बैठक घेऊन तिचा अहवाल वरिष्ठांना पाठविण्याचे आदेश पोलीस महासंचालक दयाळ यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा यांना दिले आहेत. त्यानुसार त्यांनी काही तपास अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन माहिती घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पानसरे हत्येप्रकरणी सुरू असलेल्या तपासाची माहिती देता येत नाही. ती गोपनीय आहे. आम्ही शेवटपर्यंत तुम्हाला तपासाबाबत काही सांगू शकणार नसल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)