शहरं
Join us  
Trending Stories
1
डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
6
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
7
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
8
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
9
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
11
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
12
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
13
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
14
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
15
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
16
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
17
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
18
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
19
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
20
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
Daily Top 2Weekly Top 5

दैनंदिन ई-पास ३२९० जणांना नाकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:26 IST

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या जिल्हाबंदीत सोमवारी दिवसभरात ४०५४ जणांनी कोल्हापूर पोलीस दलाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरून ई-पासची मागणी ...

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या जिल्हाबंदीत सोमवारी दिवसभरात ४०५४ जणांनी कोल्हापूर पोलीस दलाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरून ई-पासची मागणी केली; पण त्यापैकी ३२९० जणांना ई-पास प्रशासनाने नाकारले. त्यांनी दिलेली कारणे सबळ नसल्याने हे ई-पास नाकारण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.

घरातील व्यक्तीचे लग्न, नातेवाइकाचा अंत्यविधी आणि अत्यावश्यक आरोग्य तसेच अडकून पडलेल्यांना जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी पोलीस दलाकडून ई-पास देण्याची कार्यवाही सुरू केली आहे. जिल्ह्याबाहेर जाण्याची परवानगी मिळण्यासाठी ई-पाससाठी कोल्हापूर पोलीस दलाच्या http//covid19.mhpolice.in / या संकेतस्थळावर जाऊन अर्जदाराने कागदपत्रांची पूर्तता करायची आहे. त्यानंतर ई-पासबाबत निर्णय दिला जातो. त्यासाठी कोणत्या जिल्ह्यात जाणार, सबळ कारणाचा पुरावा द्यावा लागतो.

सोमवारी या संकेतस्थळावर ४०५४ जणांनी ई-पास मागणीचे अर्ज केले; पण त्यापैकी फक्त ५८१ जणांना जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ई-पास मंजूर केले, तर सबळ कारण नसल्याने ३२९० जणांचे अर्ज नामंजूर करून त्यांना ई-पास नाकारले. त्याशिवाय १८३ जणांचे ई-पास मंजूर झाले; पण त्याची वैधता संपल्याने त्याचा लाभ घेता आला नाही.