डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकीच्या चौघांचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:19 IST2021-05-29T04:19:53+5:302021-05-29T04:19:53+5:30

नवे पारगाव : तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चौघांची एमबीए अभ्यासक्रमासाठी निवड झाली ...

D. Y. Success of four of Patil Agricultural Engineering | डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकीच्या चौघांचे यश

डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकीच्या चौघांचे यश

नवे पारगाव : तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चौघांची एमबीए अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. सुजय झांबरे व नागेश भोसले यांची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लांटेशन मॅनेजमेंट बेंगलोर, सोनाली घागरे हिची वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, पुणे तर अभिनंदन अडसूळ याची आय. सी. एफ. ए. आय. बिझनेस स्कूल मुंबई या राष्ट्रीय मानांकित संस्थांमध्ये शिक्षणाची संधी मिळणार आहे.

एमबीए प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या मॅट परीक्षेत सुजयने ९९.४०, नागेशने ९९.५४, सोनालीने ९९.३७ व अभिनंदनने ९८.८८ टक्के मिळवून यश मिळवले. यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, प्रा. के. आर. पवार, डॉ. जे. एस. घाटगे, प्रा. पी. डी. उके यांचे मार्गदर्शन मिळाले.

Web Title: D. Y. Success of four of Patil Agricultural Engineering