शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा बुधवारी दीक्षांत समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:24 IST

कसबा बावडा : येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा ९वा दीक्षांत समारंभ बुधवारी (दि. १७) हॉटेल सयाजी येथील ...

कसबा बावडा : येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा ९वा दीक्षांत समारंभ बुधवारी (दि. १७) हॉटेल सयाजी येथील व्हिक्टोरिया सभागृहात सकाळी ११ वाजता होणार आहे. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय खोले उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलपती डॉ. संजय डी. पाटील असणार आहेत. यावेळी अभिनेते आर. माधवन, साहित्यिक प्रा. कुन्तीनाथ करके यांना डी.लिट. व एअर मार्शल अजित शंकरराव भोसले यांना डी.एस्सी. पदवीने सन्मानित केले जाणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल यांनी दिली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. शिम्पा शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, उपकुलसचिव संजय जाधव, परीक्षा नियंत्रक अरुण पोवार, आदी उपस्थित होते. डॉ. मुदगल म्हणाले, नवव्या दीक्षांत समारंभात एकूण ३६१ विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी प्रदान केली जाणार आहे. यावेळी नऊ विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाने, तर दोन विद्यार्थ्यांना एक्सलन्स ऑफ रिसर्च म्हणून सन्मानित केले जाणार आहे.

चौकट:.... दीक्षांत समारंभात डी.लिट. पदवीने सन्मानित केले जाणारे रंगनाथन माधवन हे फिल्म इंडस्ट्री व समाजसेवा क्षेत्रात कार्यरत आहेत. अभिनेता, लेखक आणि चित्रपट निर्माते आहेत. वयाच्या १८ व्या वर्षी कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात शिक्षण घेताना त्यांनी सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळविली. त्यांच्या ‘रंग दे बसंत’, ‘गुरू’ आणि ‘थ्री इडियट्स’ या तीन चित्रपटांनी प्रचंड यश मिळविले.

२)चौकट:.....

डी.एस्सी. पदवीने सन्मानित केले जाणारे भारतीय वायुसेनेचे निवृत्त एअर मार्शल अजित शंकरराव भोसले कोल्हापुरातील बस्तवडे गावात शेतकरी कुटुंबातले. त्यांनी नाशिकच्या भोसले मिलिटरी स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि १९७३ मध्ये ते पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) मध्ये दाखल झाले. एम.एस्सी., एमबीए आणि एम.फिल पदवी घेतलेल्या भोसले यांनी टोकियोमध्ये जपानी सशस्त्र दलात एक वर्षाचे प्रशिक्षणही घेतले आहे. सियाचीन व श्रीलंका मोहीम आणि कारगिल युद्धात त्यांनी भाग घेतला आहे. ३)चौकट:... डिलीटने सन्मानित केले जाणारे कुन्तिनाथ देवेंद्र करके-पाटील हे डॉ. बापूजी साळुंखे यांचे विद्यार्थी आहेत. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत त्यांनी मुख्याध्यापक ते प्राचार्य म्हणून काम केले. पाजर, चैत्रपालवी, कांचन कुंभ, जलधारा असे साहित्य त्यांचे प्रसिद्ध आहे. औंदा लगीन करायचं, बोला दाजीबा, सख्या सजना, सुळावरची पोळी, सोंगाड्या, आदी चित्रपटातील गीते त्यांनी लिहिली आहेत. दूरदर्शनवर त्यांचे लोकसंगीताचे अनेक कार्यक्रम झाले आहेत.

फोटो... एअर मार्शल अजित शंकरराव भोसले, डॉ. विजय खोले, रंगनाथन माधवन, प्रा. कान्तीनाथ कुरके.