शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
3
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
4
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
5
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
6
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
7
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
8
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
9
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
10
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
11
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
12
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
13
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
14
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
15
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
16
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
17
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
18
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
19
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
20
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

खेड्यापाड्यातील ग्राहक होतोय अपडेट; कोल्हापूर जिल्हा बँकेचा ७ हजार कोटींचा डिजिटल व्यवहार

By राजाराम लोंढे | Updated: February 18, 2026 18:31 IST

ऑनलाईन व्यवहार वाढला, बँकेतील ग्राहक कमी झाला

राजाराम लोंढे

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (केडीसीसी) चालू आर्थिक वर्षातील दहा महिन्यांत ग्राहकांनी तब्बल ७ हजार ७१६ कोटींचा डिजिटल व्यवहार केला आहे. यामध्ये सर्वाधिक ४,२९७ कोटी मोबाईल बँकिंग व्यवहार झाले आहेत. खेड्यापाड्यातील ग्राहक अपडेट होत असून, ऑनलाईन व्यवहार वाढल्याने ग्राहक बँकांच्या शाखेत येण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

जिल्हा बँक ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. बँकेच्या बहुतांश शाखा या छोट्या छोट्या गावांत आहेत. पण, गेल्या तीन-चार वर्षांपासून बँकेने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन ग्राहकांना अद्ययावत सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांच्या स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर काळानुसार अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. हे ओळखून ‘मोबाईल बँकिंग’, ‘यूपीआय’, ‘मायक्रो एटीएम’, ‘क्यूआर कोड’, ‘ए.टी.एम.’ आदी सुविधा बँकेने ग्राहकांना उपलब्ध करुन दिल्या आहेत. 

बँकेचे ९ लाखांपेक्षा अधिक ग्राहक आहेत, त्यापैकी ७५ टक्के ग्राहक ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे या सुविधांचा वापर ग्रामीण ग्राहक किती ताकदीने करणार याविषयी सुरुवातीला साशंकता होती. पण, बँकेच्या यंत्रणेने नियोजनबद्ध ग्राहकांपर्यंत सुविधा पोहोचवल्या. सुरुवातीच्या टप्प्यात याेजनांना अल्प प्रतिसाद मिळाला, पण चालू आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांनी झोकून देऊन काम केले.

पाच लाख ग्राहकांना ‘एसएमएस’ अलर्ट

जिल्हा बँकेशी नऊ लाखांहून अधिक ग्राहक कार्यरत आहेत. त्यापैकी ५ लाखांपेक्षा अधिक ग्राहकांनी ‘एसएमएस’ अलर्ट ही सेवा घेतली आहे. ऑनलाईन व्यवहार झाल्यानंतर तात्काळ मेसेज द्वारे त्याची माहिती ग्राहकांना होते.

या आर्थिक वर्षात असा झाला डिजिटल व्यवहार

सुविधा  - संलग्न ग्राहक - उलाढाल

  • मोबाईल बकिंग - ७७ हजार २१३ - ४२९७ कोटी
  • युपीआय  - १ लाख १९ हजार - ३१८२ कोटी
  • मायक्रो एटीएम - ५१ हजार ११३  - ८४ कोटी
  • क्यूआर कोड - १० हजार २८१ - १५३ कोटी

बँकिंग स्पर्धेत राहण्याबरोबरच ग्राहकांचा वेळ व पैशाची बचत व्हावी, यासाठी डिजिटल व्यवहार खूप महत्त्वाचे आहेत. गेल्या चार-पाच वर्षांत बँकेने खूप वेगाने वाटचाल करत ग्राहकांना जलद सेवा दिली आहे. जास्तीत जास्त ग्राहकांनी या सुविधा वापर करावा. - जी.एम. शिंदे (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बँक)

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur District Bank Sees ₹7,000 Crore in Digital Transactions

Web Summary : Kolhapur District Bank witnesses ₹7,716 crore digital transactions in ten months, driven by mobile banking. Rural customers are embracing online facilities, reducing branch visits. The bank offers mobile banking, UPI, micro ATMs and QR codes to its nine lakh customers, enhancing convenience and saving time.