शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

‘एफआरपी’सह गाळप हंगामाची रणनीती ठरणार

By admin | Updated: October 8, 2015 01:04 IST

तिढा आज सुटणार ? : जिल्हा बॅँकेत साखर कारखानदारांच्या बैठकीत होणार निर्णय

कोल्हापूर : आगामी साखर हंगामातील ‘एफआरपी’बाबत नेमकी काय भूमिका घ्यायची? याबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत आज, गुरुवारी सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील साखर कारखानदारांची बैठक होत आहे. हंगाम कधी सुरू करायचा? ‘एफआरपी’चा तिढा कसा सोडवायचा? याबाबत या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. साखरेच्या घसरलेल्या दरामुळे गत हंगामातील ‘एफआरपी’ देताना साखर कारखान्यांची दमछाक उडाली आहे. अनेक कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांचे पैसे दिलेले नाहीत. तोपर्यंत नवीन हंगाम समोर आला आहे. साखरेच्या दरात फारशी सुधारणा न झाल्याने यंदाही ‘एफआरपी’चा गुंता कायम राहणार आहे. यासाठी साखर कारखान्यांनी आपल्या सर्वसाधारण सभेत ‘एफआरपी’ तीन टप्प्यांत देण्याचे ठराव केले आहेत; पण याला शेतकरी संघटनांनी विरोध केला आहे. ‘एफआरपी’ एकरकमीच मिळाली पाहिजे, यावर शेतकरी संघटना ठाम असल्याने कारखान्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. कारखानदारांच्या या भूमिकेविरोधात ‘स्वाभिमानी’चे नेते खासदार राजू शेट्टी यांनी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्याने कारखानदार एकवटले आहेत. कारखानदारांचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ हे करत असून, त्यांनी जिल्ह्णातील सर्व कारखानदारांची बैठक जिल्हा बॅँकेत बोलावली आहे. यामध्ये हंगाम कधी सुरू करायचा?, ‘एफआरपी’चा गुंता कसा सोडवायचा? या दोन बाबींवर चर्चा होणार आहे. (प्रतिनिधी)हंगाम लांबणीवर१५ आॅक्टोबरपासून हंगाम सुरू करण्याची तयारी जिल्ह्यातील काही कारखान्यांची होती. परंतु, हादग्याच्या नक्षत्राने गेले पाच-सहा दिवस जोरदार हजेरी लावल्याने हंगाम लांबणीवर पडणार आहे. १ नोव्हेंबरला हंगाम सुरू करायचा म्हटले तर ११ नोव्हेंबरला दिवाळी असल्यामुळे ऊसतोडणी मजूर येणार नाहीत. त्यामुळे दसऱ्यानंतर साधारणत: २२ आॅक्टोबरनंतर हंगाम सुरूच करायचा, असा प्रयत्न कारखानदारांचा आहे.दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कारखाने लवकर सुरू करणे गरजेचे होते; पण गेले चार-पाच दिवस पाऊस झाल्याने थोडे दिवस थांबावे लागणार आहे. गत हंगामाप्रमाणेच यावर्षीही साखर उद्योग अडचणीत आहे. ‘एफआरपी’चा प्रश्न व दुष्काळ यातून मार्ग काढून हंगाम सुरू करावा लागणार आहे. यावर चर्चा करण्यासाठी जिल्हा बॅँकेचा अध्यक्ष म्हणून ही बैठक बोलावली आहे. -हसन मुश्रीफ, आमदार