शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता हाच जागावाटपाचा निकष : विनोद तावडे

By admin | Updated: August 4, 2014 00:23 IST

मराठा आरक्षण न्यायिक स्तरावर टिकणार नाही

कोल्हापूर : राज्यातील सत्ता मिळविणे हाच महायुतीमध्ये जागावाटपाचा निकष असेल. याच मुद्द्याला धरून मित्रपक्षांसोबत उपसमित्यांच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. पक्षीय ताकद पाहूनच मित्रपक्षांना जागा सोडली जाईल, असे स्पष्टीकरण भाजपचे नेते व विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी आज, रविवारी येथे पत्रकार परिषदेत केले. मराठा आरक्षणाची सत्ताधाऱ्यांनी घाई केली असून, न्यायिक स्तरावर ते टिकणार नाही; मात्र राज्यात सत्तापालट होताच, आरक्षण सक्षमपणे राबविण्यात येईल, अशी ग्वाही तावडे यांनी यावेळी दिली.तावडे म्हणाले, शिवसेना-भाजपच्या उमेदवारांनी गेल्या अनेक निवडणुकांत दहा हजारांचाही टप्पा ओलांडलेला नाही, अशा ३० ते ३५ जागांबाबतच बाहेरील उमेदवारांबाबत निर्णय होऊ शकतो. जनतेत स्थान असणाऱ्या, भ्रष्टाचार व अकार्यक्षमता यांपासून लांब असलेल्या कोणत्याही पक्षाच्या नेत्याचे भाजपमध्ये स्वागत आहे. राज्यभर ९ ते १५आॅगस्टदरम्यान ‘खुर्ची हटाव’ मोहीम राबविण्यात येणार आहे. सत्ता आल्यानंतर लोकसभा निवडणुकीनंतर राज्य शासनाने राबविलेल्या सर्व लोकहिताच्या योजनांचा फेरआढावा घेतला जाईल. सर्व घोटाळ्यांची कालबद्ध चौकशी केली जाईल. सीमाप्रश्नी सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य करावाच लागेल. मात्र, तोपर्यंत सीमाभागातील जनतेवर जोर व बळाचा वापर होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. भविष्यात सीमाप्रश्नी शिवसेनेने भाजपला सोबत घेऊनच आंदोलन करावे, असे आवाहनही तावडे यांनी केले. (प्रतिनिधी)मराठा आरक्षणाची घाईराणे समितीने सर्वंकष अभ्यास न करताच २० टक्के मराठा आरक्षणाची घाई केली. यामध्येही मुस्लिमांचे चार टक्के आरक्षण घुसडले.न्यायिक स्तरावर हे आरक्षण टिकणार नाही. भाजप राज्यात सत्तेवर येताच अधिक सक्षमपणे आरक्षणाची प्रक्रिया राबवील.- विनोद तावडे (विरोधी पक्षनेता)