शमशुद्दीन मुश्रीफ यांच्यावर फौजदारी करा

By Admin | Updated: January 15, 2015 00:35 IST2015-01-15T00:30:56+5:302015-01-15T00:35:31+5:30

राजेश क्षीरसागर : हिंदुत्ववादी संघटनांनी दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन

Criminalize Shamsuddin Mushrif | शमशुद्दीन मुश्रीफ यांच्यावर फौजदारी करा

शमशुद्दीन मुश्रीफ यांच्यावर फौजदारी करा

कोल्हापूर : माजी पोलीस अधिकारी शमशुद्दीन मुश्रीफ यांनी प्रसिद्धी मिळविण्याच्या हेतूने ‘व्हू किल्ड करकरे’ या पुस्तकातून हिंदुत्वावर टीका केली. महाराष्ट्राचे दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख शहीद हेमंत करकरे यांची हत्या कोणी केली, हे जगजाहीर आहे. अतिरेक्यांचे पाप लपविण्यासाठी ते हिंदुत्ववाद्यांवर खोटे आरोप करत आहेत. त्यामुळे मुश्रीफांवर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी निवेदनाद्वारे केल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकाद्वारे दिली.मुश्रीफ यांनी कोल्हापुरात एका कार्यक्रमात करकरे यांची हत्या ब्राह्मण्यवाद्यांकडून झाल्याची तथ्यहीन टीका केली होती. प्रसिद्धीपोटी केलेल्या या टीकेमध्ये त्यांनी हेमंत करकरे यांचा बळी कोणत्या धर्मियांनी घेतला हे जाहीर केले नाही. जगामध्ये कोणत्या धर्माचे दहशतवादी आहेत, हे सर्वांनामाहीत आहे. धर्मांध मुस्लिमांचे पाप लपविण्यासाठी मुश्रीफ यांनी खोटे आरोप केले आहेत. त्यांनी केलेले आरोप तथ्यहीन आहेत. जातीय तेढ निर्माण करून कोल्हापूर शहर अशांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे मुश्रीफ यांच्या पुस्तकावर बंदी घालून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Criminalize Shamsuddin Mushrif