विनापरवाना ट्रॅक्टर रॅलीबद्दल शेट्टींसह कार्यकर्त्यांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:55 IST2021-02-05T06:55:55+5:302021-02-05T06:55:55+5:30

कोल्हापूर : विनापरवाना ट्रॅक्टर रॅली काढून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढविणारे कृत्य केल्याबद्दल माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी ...

Crimes against activists, including Shetty, for unlicensed tractor rallies | विनापरवाना ट्रॅक्टर रॅलीबद्दल शेट्टींसह कार्यकर्त्यांवर गुन्हे

विनापरवाना ट्रॅक्टर रॅलीबद्दल शेट्टींसह कार्यकर्त्यांवर गुन्हे

कोल्हापूर : विनापरवाना ट्रॅक्टर रॅली काढून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढविणारे कृत्य केल्याबद्दल माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या २०० ते २५० कार्यकर्त्यांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

केंद्र सरकारने शेती क्षेत्रासंबंधी अध्यादेश व लोकसभेत मंजूर केलेले तिन्ही कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी विनापरवाना सांगली ते कोल्हापूर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची सांगता कोल्हापुरात दसरा चौकात झाली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढविणारे कृत्य केल्याबद्दल लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात माजी खासदार राजू शेट्टी, सावकार मादनाईक, जालंदर पाटील, जनार्दन पाटील, वैभव कांबळे, भाऊ साखरपे यांच्यासह २०० ते २५० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

Web Title: Crimes against activists, including Shetty, for unlicensed tractor rallies