शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

आनंदराव पाटील यांच्यावर गुन्हा

By admin | Updated: June 12, 2015 00:34 IST

लाल दिव्याचा गैरवापर : न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई

सातारा : कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद नसताना पदाचा दुरुपयोग, तसेच लेटरपॅड आणि लालदिव्याचा गैरवापर केल्याप्रकरणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार आनंदराव पाटील यांच्यावर गुरुवारी शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.काही दिवसांपूर्वी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना आनंदराव पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे.‘कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद नसताना आनंदराव पाटील यांनी तसे भासवून शासनाच्या विविध सोयी-सवलतींचा लाभ घेतला तसेच खोट्या पद्धतीने सामाजिक प्रतिष्ठा उंचावण्याचा प्रयत्न केला,’ अशी दिशा विकास मंचचे अध्यक्ष सुशांत मोरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात दाद मागावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे भारतीय दंडविधानाच्या विविध कलमांद्वारे फौजदारी खटला दाखल करण्यात आला होता.मोरे यांच्या वतीने अ‍ॅड. चंद्रकांत बेबले यांनी काम पाहिले होते. याबाबत सखोल चौकशी करून पाटील यांना योग्य शासन व्हावे, या फिर्यादीची दखल घेऊन पाटील यांच्याविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५६ (३) अन्वये सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी ए. एस. नेवसे यांनी पोलीस अधीक्षकांना दिले होते. त्यानुसार पोलिसांनी आनंदराव पाटील यांच्याविरोधात गुरुवारी शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक बुरसे अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)तब्बल अकरा कलमांचा समावेश आनंदराव पाटील यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात तब्बल अकरा विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७०, १७१ (तोतयागिरी) १८८, १९७, (खोटा पत्रव्यवहार करणे), ४०६, ४१५, ४२० (फसवणूक), ४६५, ४६७,४७१ (बनावट कागदपत्र तयार करणे), ४०९ (लोकप्रतिनिधीकडून फसवणूक) या कलमांचा त्यामध्ये समावेश आहे.