शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कोविशिल्ड लस घेण्याचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:23 IST

कोल्हापूर : एकीकडे जिल्ह्यात कोविशिल्ड लस घेणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रमाण वाढले असताना, दुसरीकडे कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची ...

कोल्हापूर : एकीकडे जिल्ह्यात कोविशिल्ड लस घेणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रमाण वाढले असताना, दुसरीकडे कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसात वाढली आहे. त्यामुळे ४० च्या आत आलेली रुग्णसंख्या सध्या १०२ वर पोहोचली आहे, तर दोघांचा मृत्यू झाला आहे.

कोविशिल्ड देण्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी जिल्ह्यात ११०० लसीकरणाचे उद्दिष्ट असताना दिवसभरामध्ये ७७८ जणांनी लस घेतली आहे. यामध्ये जाणीवपूर्वक वैद्यकीय अधिकाऱ्यांना लस घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दिवसभरात सीपीआरमधील डॉ. अनिता सैब्बनावर, डॉ. हर्षला वेदक, डॉ. शानबाग यांनी ही लस टोचून घेतली. कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयामध्ये तर लस घेण्यासाठी आशा स्वयंसेविकांनी रांग लावली होती. शिरोळ ग्रामीण रुग्णालयामध्ये दिवसभरामध्ये उद्दिष्टपूर्ती झाली असून तेथेही १०० जणांनी लस घेतली आहे. उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथेही १०० जणांनी लस घेतली. कोल्हापूर शहरामध्ये लसीकरणाला चांगला प्रतिसाद आहे.

कोल्हापूर शहरामध्ये ६ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले असून नगरपालिका क्षेत्रात ४, तर इतर जिल्ह्यातील दोघांना लागण झाली आहे. दिवसभरामध्ये २८६ जणांची तपासणी करण्यात आली असून ९०१ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. १३९ जणांची ॲन्टिजेन टेस्ट घेण्यात आली असून सध्या १०२ जणांवर उपचार सुरू आहेत. शिवाजी पेठ कोल्हापूर येथील ७४ वर्षीय व्यक्तीचा, तर डोंबिवली वेस्ट येथील ६५ वर्षीय पुरूषाचा कोरोनामुळे बुधवारी मृत्यू झाला.

चौकट

सीपीआरमध्येच प्रतिसाद कमी

एकीकडे सीपीआरमधील आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेण्यासाठी ८०० हून अधिक जणांनी नोंदणी केली आहे. मात्र याच ठिकाणी लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. बुधवारी दिवसभरामध्ये १०० जणांना लस टोचायची असताना, केवळ १३ जणांनी लस टोचून घेतली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेण्यासाठी त्यांना उद्युक्त करण्यामध्ये सीपीआरच कमी पडत असल्याचे दिसून येत आहे.

चौकट

सीपीआरमध्ये हृदयशस्त्रक्रिया सुरू

गेले वर्षभर सीपीआरमध्ये बंद असलेल्या हृदयशस्त्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. ‘लोकमत’सह शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे अखेर या विभागासाठी भूलतज्ज्ञ म्हणून डॉ. हेमलता देसाई यांची नियुक्ती करण्यात आली असून मंगळवारी पहिली शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आता देसाई यांची नियुक्ती झाल्यामुळे नव्याने हृदयशस्त्रक्रियांचे नियोजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

चौकट

फायर ऑडिटसाठी जिल्हा नियोजनकडे निधीची मागणी

दरम्यान, जिल्हा परिषदेत बुधवारी आरोग्य समितीची सभा झाली. यामध्ये फायर ऑडिटसाठीचे प्रस्ताव तयार करून त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी करावी, अशी सूचना आरोग्य समितीचे सभापती हंबीरराव पाटील यांनी केली. आरोग्य संस्थांच्या उभारणीसाठी जागा देणाऱ्यांना आवश्यक ना हरकत प्रमाणपत्रे मोफत द्यावीत, तालुका पातळीवर औषधांचा वेळेत पुरवठा करावा, अशा सूचना करण्यात आल्या.

यावेळी कोरोना, लसीकरण, कुष्ठरोग, क्षयरोग यासह अन्य आरोग्य योजनांचा आढावा घेण्यात आला.

दीपक जाधव यांचा फोटो वापरावा