शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
2
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
3
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
4
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
5
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
6
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
7
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
8
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
9
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
10
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
11
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
12
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
13
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
14
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
15
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
16
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
17
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
18
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

चळवळीसाठी हवा प्रत्येकाचा हातभार

By admin | Updated: August 17, 2014 22:32 IST

हौतात्म्याला एक वर्ष...

जगदीश कोष्टी - सातारा -- अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली कीड आहे. ती नष्ट करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी या संघटनेच्या माध्यमातून आयुष्यभर अंधश्रद्धेविरुद्ध लढा दिला. ही चळवळ अशीच पुढे नेण्यासाठी नव्या पिढीला बाळकडू देण्याची गरज आहे, असा सूर विविध बँकांमधील अधिकाऱ्यांमधून उमटू लागला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी चालविलेली अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ केवळ सातारा जिल्ह्यापुरती मर्यादित राहिलेली नसून ती राज्याच्या कानाकोपऱ्या पोहोचली आहे. सातारा शहरात विविध राष्ट्रीयीकृत बँकांचे काम चालते. याठिकाणी कार्यरत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समाजात थेट संपर्क येत नसला तरी हा घटक या चळवळीकडे संवेदनशील नजरेतून पाहत आहे. चळवळ पुढे नेण्यासाठी दाभोलकरांएवढाच त्यांच्या मुलांनी हा वारसा जपला आहे. दाभोलकरांना आपल्यातून जाऊन एक वर्ष होत नाही, तोच त्यांचे चिरंजीव डॉ. हमीद दाभोलकर व दाभोलकर कुटुंबीयांनी आपले घर ‘तारांगण’ हे कार्यकर्ते घडविण्यासाठी समितीला दिले आहे. याठिकाणी कार्यकर्ता घडविण्याच्या दृष्टीने विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे काम केवळ दाभोलकर कुटुंबीयांचे नसून प्रत्येकाचे आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीने चळवळ पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही मत व्यक्त होत आहे. अधिकाऱ्यांनी मांडले परखड मतअंधश्रद्धा निर्मूलन चळवळ वाढवायची असेल तर भावी पिढीत ती रुजवणे गरजेचे आहे. पाठ्यपुस्तकात थोरांचे धडे असतात. त्याप्रमाणे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कार्याची माहिती देणारा धडा शालेय पाठ्यपुस्तकात समावेश करणे गरजेचे आहे. वयस्क व्यक्तींपेक्षा बालकांवर योग्य संस्कार केल्यास ते अधिक परिणामकारक ठरू शकते.- बाळकृष्ण खाडेसमाजात अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत. श्रद्धा-अंधश्रद्धा याविषयी दाभोलकरांचा अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू होता. त्यांनी कधीही धर्माला, रूढी-परंपरांना विरोध केला नाही. आपल्या श्रद्धेमुळे समाजाला बाधा पोहोचणार नाही, यादृष्टीने प्रत्येकानेच वागायला हवे.- अजित शहाणेडॉ. नरेंद्र दाभोलकरांनी समाजातील अंधश्रद्धेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आयुष्यभर लढा दिला. त्यांच्या वाट्यालाच ही वेळ येणे दु:खद आहे. त्यांच्या मागे त्यांची चळवळ नेटाने पुढे नेण्याची जबाबदारी प्रत्येकाचीच आहे. आयुष्यभर त्यांच्या विचाराने वाटचाल करणे गरजेचे आहे. यासाठी सर्वसामान्यांना बळ देण्यासाठी समाजातील जानकरांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेणे गरजेचे आहे.- डी. एन. दोरगे, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक, बँक आॅफ बडोदा