शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

Kolhapur: दुचाकी-टेम्पोच्या धडकेत दाम्पत्य ठार; दीपावलीचा बाजार करून परतताना घडली दुर्दैवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 18:32 IST

राशिवडे : राशिवडे येळवडे (ता. राधानगरी) दरम्यान दुचाकी व मालवाहतूक टेम्पोची समोरासमोर धडक झाली. यामध्ये संजय वसंत कांबळे (वय ...

राशिवडे : राशिवडे येळवडे (ता. राधानगरी) दरम्यान दुचाकी व मालवाहतूक टेम्पोची समोरासमोर धडक झाली. यामध्ये संजय वसंत कांबळे (वय ४५) व त्यांची पत्नी सुरेखा संजय कांबळे (वय ४०) हे दोघे ठार झाले.राशिवडे बाजारपेठेतून दीपावलीचा बाजार करून सायंकाळी सातच्या सुमारास हे दाम्पत्य पुंगाव (ता. राधानगरी) येथे आपल्या गावी दुचाकीवरून जात होते. येळवडेहून राशिवडेच्या दिशेने येणाऱ्या मालवाहतूक टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक होऊन दुचाकीवरील संजय कांबळे जागीच ठार झाले. अपघातात टेम्पो मोठ्या चरीत जाऊन उलटला.सुरेखा कांबळे यांना गंभीर जखमी अवस्थेत सीपीआर येथे दाखल केले होते. दरम्यान, उपचार सुरू असताना त्यांचाही मृत्यू झाला. संजय कांबळे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. अपघातानंतर रस्त्याच्या दुतर्फा वाहतूककोंडी झाली होती. राधानगरी पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.कुटुंब रस्त्यावर..सेंट्रिंग काम करणाऱ्या संजय कांबळे यांना चार मुली आहेत. एक विवाहित, तीन शिक्षण घेणाऱ्या व अंध आई असा परिवार आहे. सुरेखा कांबळे याही रोजंदारी करून कुटुंबाला हातभार लावत होत्या. आज त्या परिते येथे दीपावलीसाठी लाडू बांधण्यासाठी हजेरीवर कामाला गेल्या होत्या. त्यांना आणण्यासाठी संजय गेले होते. घरी जात असताना दीपावलीचा बाजार घेऊन ते दोघे घरी निघाले होते, मात्र वाटेतच त्यांच्यावर काळाने झडप घातली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिस